शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

अनाथाच्या मदतीसाठी सरसावले अनाथांचे हात

By admin | Updated: May 13, 2017 02:34 IST

अनाथांना कुणी वाली नसतो. ना आई, ना वडील, ना कुणी नातेवाईक. जीवाला दुखले-खुपले तरी रडत वेदना सहन कराव्या लागतात.

जगावेगळा आदर्श : प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिरातील संस्काराचे विधायक दर्शन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनाथांना कुणी वाली नसतो. ना आई, ना वडील, ना कुणी नातेवाईक. जीवाला दुखले-खुपले तरी रडत वेदना सहन कराव्या लागतात. असा कुणी सापडत नाही जो मायेने उपचाराची सावली धरेल त्या आजारावर. परंतु प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून माणुसकीच्या नात्याचा जगावेगळा आदर्श उभा केला आहे. आपल्याच एका अनाथ सहकाऱ्याच्या उपचारासाठी या अनाथांनी पुढाकार घेतला असून विविध संस्थांमधून निधी उभारत एका अनाथाचे पालकत्व स्वीकारले आहे. रेल्वेस्थानकावर भटकंती करणाऱ्या मुलांची प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिर ही शाळा महापालिकेच्या मदतीने सुरू आहे. देशभरातील वेगवेगळ्या शहरात भटकंती करणारी मुले एक मेकांच्या आधाराने येथे संस्काराचे, शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. या मुलांमध्येच गणेश कुमरे हा मुलगासुद्धा वास्तव्यास आहे. त्याला तोंडाचा आजार झाला असून, डॉक्टरांनी आॅपरेशन सांगितले आहे. लाखो रुपयांचा खर्च येणार आहे. हाच निधी उभारण्यासाठी त्याचे सहकारी पुढे आले असून आपल्या मित्राच्या मदतीसाठी त्यांच्या मनात निर्माण झालेली कर्तव्याची भावना या ज्ञानमंदिरात मिळणाऱ्या शिक्षण आणि संस्कारामुळेच आली आहे. प्लॅटफॉर्मवर भटकणारे, दोन वेळच्या अन्नासाठी वाट्टेल ते करणारे, आईवडिलांपासून दुरावलेल्या बालकांना जेव्हा संस्काराचे व्यासपीठ मिळते तेव्हा अशा बालकांकडून काही सत्कर्मही घडते. हे त्याचेच उत्तम उदाहरण आहे. गणेश हा २०१४ मध्ये येथे आला होता. गणेशच्या स्वभावामुळे येथील मुलांचा तो जीवलग झाला. परंतु त्याला बालपणापासून तोंडाचा आजार आहे. त्याला इतर मुलांसारखे खायला जमत नाही. हळूहळू आजार आणखी वाढतोय, प्रकृती खालावतेय. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचा सल्ला दिला आहे. यासाठीचा खर्च या अनाथाला न झेपणारा आहे. म्हणूनच त्याचे सहकारी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांकडे जाऊन गणेशला मदत करण्याची विनंती करीत आहेत. गणेश अभ्यासात हुशार असून यंदा त्याचे दहावीचे वर्ष आहे. आजारातून मुक्त होऊन त्याला परीक्षेची तयारी करता यावी म्हणून त्याच्या सहकाऱ्याची ही धडपड सुरू आहे.