शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या शेतकऱ्यांनी पिकविला सेंद्रिय ‘ब्लॅक राईस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 10:30 IST

नागपूरच्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच सेंद्रिय ब्लॅक राईस पिकविला आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा प्रयोग करण्यात आला असून, आरोग्यवर्धक असलेला हा काळा तांदूळ आता सामान्य नागपूरकरांनाही खरेदी करता येणार आहे.

ठळक मुद्दे जिल्हा कृषी महोत्सवात १२ पासून उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरच्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच सेंद्रिय ब्लॅक राईस पिकविला आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा प्रयोग करण्यात आला असून, आरोग्यवर्धक असलेला हा काळा तांदूळ आता सामान्य नागपूरकरांनाही खरेदी करता येणार आहे.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासोबत सेंद्रिय उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी येत्या १२ ते १६ जानेवारीदरम्यान कृषी विभागाच्या ‘आत्मा’तर्फे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ वसतिगृह परिसर क्रीम्स हॉस्पिटलसमोर रामदासपेठ रोड येथे जिल्हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून ग्राहकांनाही शेतकऱ्यांकडून थेट माल खरेदी करता येणार आहे. या महोत्सवात २०० स्टॉल असणार आहेत. यात ४० शासकीय, ३० स्टॉल कृषी आणि सिंचनाशी संबंधित, ४० स्टॉल गृहोपयोगी वस्तू तर २० स्टॉल धान्य महोत्सवाचे असणार आहेत. कृषी प्रदर्शनासह परिसंवाद, चर्चासत्रही होणार असून यात प्रगतिशील शेतकरी आणि तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करणार आहे.काळ्या तांदळाच्या उत्पादनाला विशेष प्रोत्साहन देण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक, मौदा, उमरेड, कुही, पारशिवनी व कामठी या तालुक्यामध्ये ७० एकर क्षेत्रात गटांमार्फत काळा तांदूळ पिकविण्यात आला. हा प्रयोग पहिल्यांदाच महाराष्ट्रात झाला. येणाऱ्या खरीप हंगामात ४०० एकरमध्ये काळ्या तांदळाच्या शेतीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. काळा तांदूळ हा हृदयरोगापासून तर विविध आजारांवर लाभदायक आहे. या महोत्सवात सेंद्रिय तांदळासोबतच तूर डाळ, चणा डाळ, गहू, ज्वारी, तीळ, मसाले, भाजीपाला, फळे आदीही विक्रीला राहतील. सेंद्रिय शेतमाल नागपूर आॅर्गनिक फार्म प्रोड्युस सिस्टीम (एनओएफपीएस) या ब्रॅण्डखाली ते विक्रीला उपलब्ध राहतील.महोत्सवाचे उद्घाटन १२ जानेवारीला खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते होईल. यावेळी आत्माच्या जिल्हा प्रकल्प संचालक नलिनी भोयर, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा सन्मानजिल्ह्यातील शासन पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांसोबत कृषी व संबंधित क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे, प्रयोगशील शेतकरी तसेच जिल्हा व तालुकास्तरावरील पीक स्पर्धा विजयी शेतकरी, गट संस्था यांचा प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मुदगल यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेती