शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘सुपर’ची १३५ पदे भरण्याचा धडकला अध्यादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2016 03:03 IST

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील पदभरतीचा प्रश्न अखेर सुटला. मंगळवारी मंत्रिमंडळात याला मंजुरी मिळाली तर गुरुवारी शासन निर्णयच धडकला.

अखेर मिळणार २७ निवासी डॉक्टर : तीन प्राध्यापकांसह पाच सहयोगी व १२ सहायक प्राध्यापकनागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील पदभरतीचा प्रश्न अखेर सुटला. मंगळवारी मंत्रिमंडळात याला मंजुरी मिळाली तर गुरुवारी शासन निर्णयच धडकला. तब्बल १७ वर्षांनंतर रुग्णालयाचा कणा असलेल्या २७ वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या पदांना मंजुरी मिळाली आहे. यासह तीन प्राध्यापक, पाच सहयोगी व १२ सहायक प्राध्यापकांनाही मान्यता देण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये चांगल्या दर्जाची सेवा मिळत असल्याने रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. परंतु त्यातुलनेत मंजूर असलेली ३६७ पदे तोकडी पडत असल्याचे चित्र होते. भारतीय वैद्यक परिषदेच्या निकषासही ‘सुपर’पात्र ठरत नव्हते. यातून पदव्युत्तर शाखेचे अनेक अभ्यासक्रमदेखील रेंगाळले होते. ही पदे भरली जात नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी देताना खंडपीठाने ही पदे तीन महिन्यांत भरण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला (डीएमईआर) दिले होते. यावर डीएमईआरने खंडपीठाला शपथपत्रही सादर केले. परंतु याची मुदत येऊनही पदे भरली गेली नव्हती. यामुळे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याची याचिका पुन्हा खंडपीठासमक्ष आली. त्यावर सुनावणी देताना खंडपीठाने मुख्य सचिवांसह संचालकांनाही नोटीस बजावली होती. हा न्यायालयीन पेच निर्माण झाल्याने यावर तोडगा काढण्यासाठी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांनी बैठक बोलावली होती. त्यात ‘सुपर’साठी १३५ पदांना प्रशासकीय मान्यता तडकाफडकी प्रदान केली. गेल्या मंगळवारी मंत्रिमंडळात या पदांना मंजुरी दिल्यानंतर गुरुवारी अध्यादेशच धडकल्याने ‘सुपर’च्या वरिष्ठ डॉक्टरांपासून ते कर्मचाऱ्यापर्यंत उत्साहाचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)हृदयशल्यचिकित्साशास्त्र विभागात असणार सहा निवासी डॉक्टर हृदयशल्यचिकित्साशास्त्र व हृदयचिकित्साशास्त्र विभागात प्रत्येकी सहा नियमित वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या पदांना मंजुरी मिळाली आहे. तर गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, मज्जातंतूशास्त्र, न्यूरोसर्जरी, नेफ्रालॉजी, यूरोसर्जरीला प्रत्येकी तीन पदे मिळाली आहेत. इंडोक्रिनॉलॉजीला एक वरिष्ठ निवासी डॉक्टरांचे पद मिळाले आहे. वर्ग एक ते तीनची ७३ पदे तीन प्राध्यापक, पाच सहयोगी प्राध्यापक, १२ सहायक प्राध्यापकासह एक वैद्यकीय अभिलेख अधिकारी, मुख्य औषध निर्माता, एक सांख्यिकी नि अधिव्याख्याता, एक परिचर्या अधीक्षक, चार समाजसेवा अधीक्षक, तीन वरिष्ठ सहायक, एक आहारतज्ज्ञ, एक अभिलेखापाल अशी वर्ग एक ते तीनच्या ७३ पदांना मान्यता मिळाली आहे. ३५ पदांची कामे बाह्ययंत्रणेद्वारे करून घेणारजीववैद्यक अभियंत्यासह १३ विविध तंत्रज्ञांची पदे, वरिष्ठ लिपिकाची आठ,लघुटंकलेखकाची तीन, ग्रंथालय सहायकाची दोन व कनिष्ठ लिपिकाची आठ अशी ३५ पदांची कामे बाह्ययंत्रणेद्वारे करून घेण्यालाही मंजुरी देण्यात आली आहे.