शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नरभक्षक वाघाला ठार मारण्याचा आदेश रद्द

By admin | Updated: June 30, 2017 02:33 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी ब्रह्मपुरी वन विभागातील नरभक्षक वाघाला ठार मारण्याचा वादग्रस्त आदेश

हायकोर्ट : नियमानुसार नवीन आदेश जारी करता येईललोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी ब्रह्मपुरी वन विभागातील नरभक्षक वाघाला ठार मारण्याचा वादग्रस्त आदेश विविध बाबी लक्षात घेता नियमबाह्य ठरवून रद्द केला. हा आदेश रद्द झाला असला तरी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना नियमानुसार नवीन आदेश जारी करता येऊ शकतो.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. बुधवारच्या आदेशानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा आवश्यक कागदपत्रे घेऊन न्यायालयात हजर झाले होते. त्यांच्यासोबत चंद्रपूर येथील मुख्य वनसंरक्षक विजय शेळके उपस्थित होते. त्यांनी अतिरिक्त सरकारी वकील केतकी जोशी यांच्यामार्फत नरभक्षक वाघाला ठार मारण्याचा निर्णय का घेण्यात आला व त्याची कशाप्रकारे ठाम ओळख पटविण्यात येईल यासंदर्भात माहिती दिली. परंतु, त्यावर न्यायालयाचे समाधान झाले नाही.वन विभागाकडे घटनास्थळांचा पंचनामा, नरभक्षक वाघाच्या पायाचे ठसे व डीएनए अहवाल नसल्यामुळे वादग्रस्त आदेश कायम ठेवता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, वन विभागाने वादग्रस्त आदेश मागे घेण्याची तयारी दर्शविली. परिणामी न्यायालयाने वादग्रस्त आदेश रद्द करून वन विभागाला कायद्यानुसार पुढील कारवाई करण्याची मुभा दिली. डॉ. जेरील बनाईत यांनी वन्यजीवांसंदर्भातील विविध मुद्यांवर जनहित याचिका दाखल केली आहे. त्यात हा वादग्रस्त आदेश रद्द करण्याची विनंती करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर व अ‍ॅड. रोहित मालविया यांनी बाजू मांडली.