लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विशेष जेएमएफसी न्यायालयाने कर्जदार एस. एल. स्ट्रक्चर्स अॅन्ड इंजिनियर्सचे प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता के. पी. राजू यांना धनादेश अनादर प्रकरणामध्ये दोषी ठरवून एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, कर्जदाते सनविजय रोलिंग अॅन्ड इंजिनियरिंग यांना ३० दिवसांत ७५ लाख रुपये भरपाई देण्यात यावी असा आदेश दिला व भरपाई न दिल्यास आरोपीला एक वर्ष अतिरिक्त साधा करावास भोगावा लागेल, असे स्पष्ट केले. न्यायाधीश शीतल कौल यांनी हा निर्णय दिला.एस. एल. स्ट्रक्चर्सला पायाभूत विकास कामांसाठी विविध आकारांचे चॅनल्स व अँगल्स हवे होते. तक्रारकर्ते सनविजय रोलिंगने त्यांना १ एप्रिल २००६ ते ४ मे २००९ या कालावधीत १ कोटी १३ लाख ५१ हजार ९४१ रुपयांचे साहित्य पुरविले. त्यानंतर एस. एल. स्ट्रक्चर्सने तक्रारकर्त्यांना पूर्ण बिल दिले नाही. फेब्रुवारी-२०११ मध्ये झालेल्या तडजोडीनंतर २४ सप्टेंबर २०११ रोजी एस. एल. स्ट्रक्चर्सने तक्रारकर्त्याला ७० लाख ५९ हजार ५०० रुपयांचा धनादेश दिला. १० आॅक्टोबर २०११ रोजी धनादेशाचा अनादर झाला. बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे धनादेश वटला नाही. त्यामुळे सनविजय रोलिंगने विशेष जेएमएफसी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. सनविजय रोलिंगतर्फे अॅड. अतुल पांडे, अॅड. आशिष किल्लेदार व अॅड. प्रमोद गभणे यांनी कामकाज पाहिले.
कर्जदात्याला ७५ लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 01:35 IST
विशेष जेएमएफसी न्यायालयाने कर्जदार एस. एल. स्ट्रक्चर्स अॅन्ड इंजिनियर्सचे प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता के. पी. राजू यांना धनादेश अनादर प्रकरणामध्ये दोषी ठरवून एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, कर्जदाते सनविजय रोलिंग अॅन्ड इंजिनियरिंग यांना ३० दिवसांत ७५ लाख रुपये भरपाई देण्यात यावी असा आदेश दिला व भरपाई न दिल्यास आरोपीला एक वर्ष अतिरिक्त साधा करावास भोगावा लागेल, असे स्पष्ट केले. न्यायाधीश शीतल कौल यांनी हा निर्णय दिला.
कर्जदात्याला ७५ लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश
ठळक मुद्देविशेष जेएमएफसी न्यायालय : धनादेश अनादराचे प्रकरण