शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाचा आदेश : त्या १५६ विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:04 IST

शिष्यवृत्तीसाठी अपात्र ठरल्यामुळे सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूूट आॅफ मास कम्युनिकेशनच्या १५६ विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला दिला. तसेच, विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क देण्यास टाळाटाळ केल्यास त्यांच्या पदव्या थांबवून ठेवण्याची मुभाही विद्यापीठास देण्यात आली.

ठळक मुद्देशिष्यवृत्तीसाठी अपात्र ठरल्यामुळे दणका

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शिष्यवृत्तीसाठी अपात्र ठरल्यामुळे सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूूट आॅफ मास कम्युनिकेशनच्या १५६ विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला दिला. तसेच, विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क देण्यास टाळाटाळ केल्यास त्यांच्या पदव्या थांबवून ठेवण्याची मुभाही विद्यापीठास देण्यात आली.२०१६-२०१७ या शैक्षणिक सत्रातील शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इन्स्टिट्यूूटच्या विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागाकडे दावे सादर केले होते. त्यांचे दावे मार्च-२०१७ पर्यंत पडताळण्यात आले नाही. त्यानंतर पडताळणी करण्यात आली असता विद्यार्थ्यांच्या अर्जांत त्रुटी आढळून आल्या. समाज कल्याण विभागाच्या चुकीमुळे त्या त्रुटी वेळेवर दूर होऊ शकल्या नाहीत. परिणामी, विद्यापीठाला निर्धारित तारखेपर्यंत परीक्षा शुल्क न मिळाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू देण्यात आले नाही. या गोंधळासाठी विद्यार्थी जबाबदार नसल्याचे आढळून आल्यामुळे उच्च न्यायालयाने सर्व विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्याचा आदेश विद्यापीठाला दिला होता. त्यानुसार विद्यापीठाने १६६ विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेतली. यादरम्यान, समाज कल्याण विभागाने शिष्यवृत्तीच्या दाव्यांवर निर्णय घेऊन १० विद्यार्थी वगळता इतर १५६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अपात्र ठरवले. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता संबंधित विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करण्याचा आदेश दिला.शिष्यवृत्तीच्या दाव्यांवर तातडीने निर्णय होण्यासाठी लोकेश मेश्राम व इतर विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ती याचिका निकाली काढली आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. विद्यार्थ्यांतर्फे अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी, इन्स्टिट्यूटतर्फे प्रा. सुनील मिश्रा तर, विद्यापीठातर्फे अ‍ॅड. प्रशांत सत्यनाथन यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ