शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

संत्र्याच्या मृग बहाराची शक्यता मावळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:07 IST

याेगेश गिरडकर लाेकमत न्यूज नेटवर्क सावरगाव : अंबिया बहाराच्या तुलनेत मृग बहाराचा संत्रा चविष्ट असल्याने बाजारात मृग बहाराच्या संत्र्याला ...

याेगेश गिरडकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावरगाव : अंबिया बहाराच्या तुलनेत मृग बहाराचा संत्रा चविष्ट असल्याने बाजारात मृग बहाराच्या संत्र्याला तुलनेत भरीव मागणी असते. यावर्षी उन्हाळ्यात व पावसाळ्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाच्या सरी बरसल्याने संत्रा झाडांना मृगाचा बहार येण्याची शक्यता आता मावळली आहे. त्यामुळे संत्रा उत्पादकांना निसर्गाच्या या लहरीपणाचा जबर फटका बसला आहे.

नरखेड तालुक्यात १०,२१५ हेक्टरमध्ये संत्र्याच्या फलधारणाक्षम बागा आहेत. यातील आठ हजार हेक्टरमध्ये अंबिया बहाराचे पीक घेतले जाते. मृग बहाराच्या संत्र्याचे पीक घेण्यासाठी झाडांना एप्रिल व मे महिन्यांत किमान ६० दिवसांचा चांगला ताण पडणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकरी एप्रिलपासून बागांना पाणी देणे बंद करतात. मात्र, यावर्षी मे महिन्यात अवकाळी पावसाच्या तालुकाभर चांगल्याच सरी बसरल्या. त्यातच सतत दाेन ते तीन दिवस ढगाळ वातावरणही हाेते. या प्रतिकूल वातावरणाचा फटका संत्र्याच्या मृग बहाराला बसला, पूर्वमशागतीची कामे व्यवस्थित पूर्ण करणे शक्य झाले नाही, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली असून, याला डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डाॅ. प्रदीप दवणे यांनी दुजाेरा दिला आहे. मृग बहाराच्या संत्र्याची फूट हाेण्याची शक्यता आता मावळल्याने, तसेच संत्र्याच्या बागांमध्ये इतर पीक घेणे शक्य नसल्याने ती शेती पेरणीविना ठेवावी लागते. त्यामुळे संत्रा उत्पादकांवर आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे.

लिंबूवर्गीय फळझाडांना बहर येण्यासाठी झाडाची वाढ करणारे अन्नद्रव्य (कर्ब/नत्र) वाढीकरिता खर्च न होता त्या अन्नद्रव्यांचा संचय होणे आवश्यक असते. अन्नद्रव्यांचा संचय झाडाच्या फांद्यांमध्ये प्रमाणबद्ध झाल्यावर पोषक हवामान मिळताच बहराची फुले नवतीसोबत दिसू लागतात. बहर धरणे म्हणजे, झाडांना पाण्याचा ताण देऊन विश्रांती देणे हाेय. निसर्गतः संत्रा-मोसंबी फळझाडास वर्षातून तीनदा बहर येतो. अवकाळी पावसामुळे झाडांचा ताण तुटला गेल्याने मृग बहर फुटण्याची शक्यता नाही, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी डाॅ. याेगिराज जुमडे यांनी दिली.

...

१५० ते २०० कोटी रुपयांचे नुकसान

अंबिया बहाराच्या संत्र्याचे अधिक पीक घेतले जात असले तरी मृग बहाराच्या संत्र्याला बाजारात दरवर्षी चांगला भाव मिळताे. जानेवारी -२०२१ मध्ये मृग बहाराच्या संत्र्याचे दर ६२ हजार रुपये प्रतिटन झाले हाेते. तुलनेत अंबिया बहाराच्या संत्र्याला ऑक्टाेबर-२०२० मध्ये २० ते २२ हजार रुपये प्रतिटन भाव मिळाला हाेता. संत्र्याच्या भावातील तफावत लक्षात घेत अवकाळी पावसामुळे नरखेड तालुक्यातील संत्रा उत्पादकांचे किमान १५० ते २०० काेटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

...

संत्र्याचे तीन बहार

संत्रा झाडांना वर्षभरात तीनदा फलधारणा हाेते. मृग नक्षत्रात काेसळलेल्या पावसामुळे जून-जुलैमध्ये फलधारणेस मृग बहार, हस्त नक्षत्रात म्हणजेच ऑक्टाेबरमध्ये हाेणाऱ्या फलधारणेस हस्त बहार आणि शिशिर ऋतूत म्हणजेच जानेवारी व फेब्रुवारीमध्ये हाेणाऱ्या फलधारणेस अंबिया बहार संबाेधले जाते. याच काळात अंब्याला बहार येत असल्याने संत्र्याच्या बहारालाही अंबिया बहार म्हणून ओळखले जाते.

...

वादळामुळे नरखेड तालुक्यातील सात हजार हेक्टरमधील अंबिया बहाराच्या संत्र्याचे नुकसान झाले आहे. याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे. मृग बहाराची फूट आल्यावर त्यावर सिट्रससिलाचा प्रादुर्भाव आढळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यावर इमिडा क्लोप्रिड किंवा क्विनॉलफॉस किंवा थायोमिथॉक्साम या औषधांची फवारणी करावी.

-डॉ. योगिराज जुमडे,

तालुका कृषी अधिकारी, नरखेड

...

यावर्षी मृग नक्षत्राआधीपासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मृग बहाराच्या फुटीसाठी आवश्यक वातावरण तयार झाले. सतत तिसऱ्या वर्षी मृग बहाराच्या फुटीवर परिणाम झाला आहे.

-नंदलाल मोवाडे,

संत्रा उत्पादक,

आग्रा, ता. नरखेड

...