शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

भरसभागृहात विरोधकांचे जन-गण-मन! मनपाच्या इतिहासात दोनदा राष्ट्रगीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 21:37 IST

महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एकाच सभागृहात दोनदा राष्ट्रगीत झाले. गुरुवारी सर्वसाधारण सभेत हा प्रकार घडला.

ठळक मुद्देराष्ट्रगीताचा मान की अपमान?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एकाच सभागृहात दोनदा राष्ट्रगीत झाले. गुरुवारी सर्वसाधारण सभेत हा प्रकार घडला. पहिल्यांदा उपस्थित केलेल्या प्रश्नांना न्याय मिळत नसल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांनी कामकाज सुरू असताना अचानक राष्ट्रगीत सुरू के ले, तर सभागृहाचे कामकाज संपताच प्रथेप्रमाणे राष्ट्रगीत झाले. पहिल्यांदा राष्ट्रगीत सुरू झाले तेव्हा महापौर नंदा जिचकार आपल्या आसनावरून न उठल्याने राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचा आरोप काँग्रेस व बसपाच्या नगरसेवकांनी केला. तर कामकाज सुरू असताना राष्ट्रगीत सुरू करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सत्तापक्षाने महापालिका प्रशासनाकडे केली. यामुळे राष्ट्रगीताचा मान की अपमान झाला, अशी मनपात चर्चा आहे.सभागृहात भाजपाचे दोनतृतीयांश बहुमत आहे. विरोधकांची संख्या मोजकीच आहे. बहुमताच्या जोरावर सत्तापक्ष आपल्या प्रस्तावांना मंजूर करतात. पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधकांच्या प्रश्नांना न्याय मिळत नाही. असाच प्रकार गुरुवारी सभागृहात काँग्रेसचे नगरसेवक कमलेश चौधरी यांनी महापालिकेतील अस्थायी वाहन चालकांना नोकरीत कायम करण्याचा मुद्दा उपस्थित केला. न्यायालयात वाहन चालकांच्या बाजूने निर्णय झाल्यानंतरही त्यांना न्याय मिळत नसल्याचे सांगितले. या प्रकरणात महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात अपील केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अजीज शेख यांनी दिली. महापौर नंदा जिचकार व माजी महापौर प्रवीण दटके म्हणाले, वाहनचालक मागील वेतन न घेण्याच्या शर्तीवर तडजोडीसाठी राजी असल्यास प्रकरण निकाली निघू शकते.चर्चेदरम्यान आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी या न्यायालयीन प्रकरणासंदर्भात सभागृहात चर्चा करता येते का, याची माहिती देण्याची प्रशासनाला सूचना केली. यावर अजीज शेख यांनी या विषयावर चर्चा करणे योग्य नसल्याचे सांगितले. यावर विरोधक संतप्त झाले. विषयपत्रिका फाडून तुकडे महापौरांच्या दिशेने भिरकावले. गोंधळातच काँग्रेसचे नगरसेवक नितीश ग्वालबन्शी, नितीन साठवणे, बंटी शेळके आदींनी राष्ट्रगीत सुरू केले. अचानक राष्ट्रगीत सुरू झाल्याने सदस्य गोंधळात पडले. लगेच सर्वजण आपल्या जागेवर उभे राहिले. महापौरही उठणार होत्या, मात्र त्यांच्या सहायकांनी त्यांना रोखले. राष्ट्रगीत होताच काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.सभागृहाचे कामकाज सुरू असताना अचानक राष्ट्रगीत सुरू करणे हे राष्ट्रगीताच्या संहितेचे व नियमावलीचे उल्लंघन असल्याचे सांगून ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी या घटनेचा निषेध नोंदविला. प्रशासनाने संबंधित नगरसेवकांना  नोटीस बजावून माफी मागण्यास सांगावे, माफी मागत नसल्यास कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.  दटके यांनी असे कृ त्य करणाऱ्यांना माफी देऊ नये, त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस करावी, अशी सूचना केली. राष्ट्रगीताचे वेळी महापौर जागेवरून न उठल्याने राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचा बसपाच्या गटनेत्या वैशाली नारनवरे यांनी आरोप केला.  महापौरांनी तांत्रिक कारण देत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. संदीप जोशी यांनी तिवारी व दटके यांच्या मागणीचे समर्थन केले. त्यानुसार महापौरांनी प्रशासनाला निर्देश दिले.राष्ट्रगीताच्या सन्मानात सर्वजण उभे झालेमहापालिका सभागृहात गोंधळ सुरू असताना अचानक राष्ट्रगीत सुरू झाले. अनेकांचा गोंधळ उडाला. राष्ट्रगीताच्या सन्मानात महापौर, आयुक्त यांच्यासह सभागृहातील सर्व सदस्य, अधिकारी व कर्मचारी उभे राहिल्याची माहिती विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी दिली. 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाNational Anthemराष्ट्रगीत