शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

सत्र न्यायालयातील सुनावणी प्रक्रियेवर आक्षेप

By admin | Updated: February 27, 2015 02:15 IST

सत्र न्यायालयातील कुश हत्याकांडाच्या सुनावणी प्रक्रियेवर बचाव पक्षाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष आक्षेप उपस्थित केले आहेत.

कुश कटारिया हत्याकांडनागपूर : सत्र न्यायालयातील कुश हत्याकांडाच्या सुनावणी प्रक्रियेवर बचाव पक्षाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष आक्षेप उपस्थित केले आहेत. सत्र न्यायालयाने बाल साक्षीदार शुभम बैद व रिदम पुरिया (दोन्ही कुशचे मित्र) यांना प्रकरणातील विसंगतीवर तपासण्याची संधी दिली नाही, अशी बचाव पक्षाची तक्रार आहे. यामुळे सत्र न्यायालयामध्ये नव्याने सुनावणी घेऊन दोन्ही बाल साक्षीदारांना तपासण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी गुरुवारी यासंदर्भात आदेश दिलेत. आदेशानुसार, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के. के. सोनवणे यांच्यासमक्ष बाल साक्षीदारांना तपासण्यात येईल. यासाठी सरकारी व बचाव पक्षाला ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता न्या. सोनवणे यांच्यासमक्ष हजर व्हायचे आहे. यानंतर न्या. सोनवणे यांना १६ मार्चपर्यंत बाल साक्षीदारांचे अतिरिक्त बयान नोंदविण्याची कार्यवाही पूर्ण करून १८ मार्चपर्यंत उच्च न्यायालयात अहवाल द्यायचा आहे. बाल साक्षीदारांना तपासताना आरोपी आयुष पुगलियालाही उपस्थित ठेवले जाणार आहे. बाल साक्षीदारांनी पोलिसांना बयान देताना कुशला आरोपी आयुषच्या अ‍ॅक्टिवा गाडीमागे धावताना पाहिले असे सांगितले होते तर, सत्र न्यायालयात बयान देताना कुशला आरोपी आयुषच्या अ‍ॅक्टिवा गाडीवर बसताना पाहिले अशी माहिती दिली होती. बयानातील या विसंगतीवर दोन्ही बाल साक्षीदारांना तपासण्याची संधी मिळाली नाही असे बचाव पक्षाचे वकील ए. एम. रिझवी यांनी उच्च न्यायालयाला सांगितले. संबंधित न्यायाधीशांनी बाल साक्षीदारांऐवजी थेट तपास अधिकाऱ्यास तपासण्यास सांगितले याकडेही त्यांनी लक्ष वेधले. विशेष सरकारी वकील राजेंद्र डागा यांनी या मुद्याचा विरोध केला. संबंधित न्यायाधीशांनी स्वत:हून संधी नाकारली नसून बचाव पक्षाच्या विनंतीवरून थेट तपास अधिकाऱ्यास तपासण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते, असे डागा यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी स्वतंत्र अर्ज दाखल करून उच्च न्यायालयाने स्वत:समक्ष बाल साक्षीदारांना तपासून घ्यावे किंवा सत्र न्यायालयाला आवश्यक निर्देश द्यावे अशी विनंती केली. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता ही जबाबदारी सत्र न्यायालयावर सोपविली आहे. सत्र न्यायालयाने आयुषला अपहरण, हत्या व पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. परंतु, त्याला भादंविच्या कलम ३६४-अ (खंडणीसाठी अपहरण) मधून दोषमुक्त करण्यात आले आहे. आयुषने त्याच्या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले आहे. याशिवाय शासनाच्या दोन अपील आहेत. एक अपील आयुषला फाशीची शिक्षा देण्यासाठी, तर दुसरे अपील भादंविच्या कलम ३६४ (अ)मधून सुटकेला आव्हान देणारे आहे. उच्च न्यायालयाने या तिन्ही याचिकांवर २५ फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी घेण्यास सुरुवात केली होती. दरम्यान हा विसंगतीचा मुद्दा उपस्थित झाला. उच्च न्यायालयात या प्रकरणावर आता २५ मार्चपासून पुढील सुनावणी करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)