शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

ऑनलाईन-ऑफलाईनचा मेळ बसविण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:09 IST

नागपूर : २०२० हे वर्ष शिक्षणक्षेत्रासाठी अडचणीचे ठरले असले तरी ऑनलाईन शिक्षणाची अगदी तळागाळापर्यंत ओळख झाली. २०२१ हे वर्ष ...

नागपूर : २०२० हे वर्ष शिक्षणक्षेत्रासाठी अडचणीचे ठरले असले तरी ऑनलाईन शिक्षणाची अगदी तळागाळापर्यंत ओळख झाली. २०२१ हे वर्ष नवीन शिक्षण क्षेत्रासाठी नवीन संधींचे राहणार आहे. ऑनलाईनसह पारंपरिक ऑफलाईन शिक्षणाचा मेळ बसवून शिक्षण प्रणालीचाच एकूण दर्जा वाढविला जाऊ शकतो. या दिशेने २०२१ मध्ये विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.

ऑनलाईन शिक्षणप्रणालीमुळे ग्लोबल व्हिलेजची संकल्पना आणखी दृढ झाली आहे. भविष्यात उद्योगक्षेत्राला विद्यार्थ्यांकडून आणखी अपडेट राहण्याची अपेक्षा राहणार आहे. कोरोनानंतर नियमित वर्ग सुरू झाल्यानंतरदेखील ऑनलाईन धडे अभ्यासक्रमात समाविष्ट करणे आवश्यक असेल. याची सुरुवात २०२१ मध्ये झाली तर ही सवय निश्चितपणे विद्यार्थी, शिक्षकांच्या अंगळवणी पडेल.

विदर्भातील विद्यापीठांनी स्किलवर भर द्यावा

विदर्भातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्यासाठी २०२१ हे बदलांचे वर्ष ठरण्याची शक्यता आहे. आजवर या विद्यापीठांनी आपल्या अध्ययन प्रणालीत चौकटीबाहेर जाण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यासोबत नॅकच्या परीक्षेलादेखील त्यांना सामोरे जायचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठित करण्यासाठी त्यादृष्टीने नव्या दमाचे अभ्यासक्रम लागू करण्याची सुरुवात २०२१ पासून झाली पाहिजे.

२०२१ मध्ये व्हाव्या या गोष्टी

- विदर्भातील तीनही विद्यापीठांत शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्या जागांवर भरतीचा मुद्दा लावून धरला पाहिजे.

-नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमांत आवश्यक बदलांना सुरुवात करावी.

- शिक्षकांच्या नियमित प्रशिक्षणाला सुरुवात करावी.

- विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगक्षेत्राचा अनुभव मिळवून देण्यावर भर द्यावा.

-२०२१ मध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयांना नॅक व एनबीएची श्रेणी मिळावी यादृष्टीने पुढाकार घेतला गेला पाहिजे.

- २०२१ च्या नॅशनल रॅंकिंगमध्ये विदर्भातील संस्थांची संख्या वाढविण्याचे आव्हान आहे. त्यादृष्टीने नियोजन व्हावे.

- तीनही विद्यापीठात पीएच.डी.चा दर्जा वाढविण्यावर भर दिला गेला पाहिजे.

- पीएच.डी.च्या मूल्यांकनाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन माध्यमातूनच सुरू ठेवावी. यामुळे संशोधकांना नाहक प्रतीक्षा करावी लागत नाही.

- शाळांच्या शुल्काची संपूर्ण माहिती एका पोर्टलवर उपलब्ध झाली पाहिजे. अतिरिक्त शुल्क देणाऱ्या शाळांवर प्रशासनाने कारवाई करावी.

- २०२० मध्ये विद्यार्थी मैदानी खेळांना मुकले. २०२१ मध्ये ही कसर भरून निघावी यादृष्टीने नियोजन व्हावे.

- शालेय अभ्यासक्रमांत आरोग्यविषयक मुद्द्यांचा समावेश व्हावा.

- शासनाने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वेळेत देण्यासाठी पुढाकार घ्यावा.

-