शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

ओसीडब्ल्यूवर विरोधक आक्रमक

By admin | Updated: June 21, 2015 03:01 IST

शहरातील नागरिकांना २४ तास तर दूरच २ तासही पाणी मिळत नाही. असे असतानाही महापालिकेने आॅरेंजसिटी वॉटर वर्क्स (ओसीडब्ल्यू)ला २६ कोटी जादा दिले आहे.

नागपूर : शहरातील नागरिकांना २४ तास तर दूरच २ तासही पाणी मिळत नाही. असे असतानाही महापालिकेने आॅरेंजसिटी वॉटर वर्क्स (ओसीडब्ल्यू)ला २६ कोटी जादा दिले आहे. लेखा परीक्षकांच्या अहवालात हा ठपका ठेवण्यात आल्याच्या मुद्यावरून काँग्रेसच्या सदस्यांनी आक्रमक भूिमका घेत ओसीडब्ल्यूला हटवा नाही तर महापौरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत सभागृहात जोरदार नारेबाजी केली. वेलमध्ये येऊन महापौर प्रवीण दटके यांचा माईक हिसकावण्याचा प्रयत्न केला. गोंधळामुळे दोनवेळा सभेचे कामकाज तहकूब करावे लागले; नंतर गोंधळताच विषय मंजूर करून सभेचे कामकाज संपविण्यात आले.प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी ओसीडब्ल्यूचा मुद्दा उपस्थित केला होता. मनपाने कंपनीला १८७.८९ एमएलडी पाण्याच्या बिलापोटी २५० एमलएलडीचे बिल दिले. वीज बिल भरण्याची जबाबदारी कंपनीची असताना मनपाच्या तिजोरीतून खर्च होत आहे. कंपनीसोबत करण्यात आलेला करारच चुकीचा असल्याचे ताशेरे लेखा परीक्षकांनी अहवालात ओढले आहे. त्यामुळे हा अहवाल चुकीचा की मनपा, हे स्पष्ट करावे; नाही तर प्रशासन सभागृहात उत्तर देण्यास सक्षम नसल्याचे सांगावे, अशी आक्रमक भूमिका ठाकरे यांनी मांडली. परीक्षणात जादाची रक्कम देण्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात प्रशासनाने स्पष्टीकरण पाठविले आहे. अहवाल चुकीचे की योग्य, असे सांगता येणार नाही. मात्र हा अहवाल मनपाला अमान्य असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उत्तरात सांगितले. तर जे आक्षेप नोंदविण्यात आले आहेत त्यावर स्पष्टीकरण पाठविण्यात आल्याची माहिती दटके यांनी दिली. या उत्तराने विरोधी सदस्यांचे समाधान न झाल्याने ठाकरे यांच्यासह काँग्रेसच्या नगरसेवकांनी ओसीडब्ल्यूविरोधात नारेबाजी सुरू केली. गोंधळामुळे दोनवेळा कामकाज तहकूब करावे लागले. त्यानंतरही गोंधळ न शमल्याने गोंधळात विषय मंजूर करून सभा गुंडाळण्याचा क्रम महापौर प्रवीण दटके यांनी कायम ठेवला. (प्रतिनिधी)