शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: सरकारचा दगाफटका करायचा डाव असेल तर मोठी चूक; रोहित पवारांचा इशारा
2
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
3
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
4
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
5
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
6
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
7
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
8
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
9
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
10
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
11
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
12
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
13
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
14
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
15
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
16
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
17
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
18
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
19
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास

पॅन्टची चेन उघडणे ही कृती लैंगिक अत्याचार नव्हे; हायकोर्टाचा निष्कर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 14:10 IST

High Court आरोपीने अल्पवयीन मुलीचा हात पकडणे किंवा स्वत:च्या पॅन्टची चेन उघडणे ही कृती लैंगिक अत्याचार ठरत नाही असा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवला आहे.

ठळक मुद्देसत्र न्यायालयाचा निर्णय बदलला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरोपीने अल्पवयीन मुलीचा हात पकडणे किंवा स्वत:च्या पॅन्टची चेन उघडणे ही कृती लैंगिक अत्याचार ठरत नाही असा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवला आहे.पाच वर्षीय मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात ५ आॅक्टोबर २०२० रोजी गडचिरोली येथील विशेष सत्र न्यायालयाने आरोपी लिबनस फ्रान्सिस कुजुर (५०) याला लैंगिक अपराधांपासून बाल संरक्षण अधिनियम (पोक्सो)मधील कलम १० (उग्र स्वरुपाचा लैंगिक अत्याचार) अंतर्गत दोषी ठरवून ५ वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. १५ जानेवारी रोजी त्या अपीलवर दिलेल्या निर्णयात उच्च न्यायालयाने सदर निरीक्षण नोंदवून सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल केला व आरोपीला विनयभंगाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून या निर्णयापर्यंत भोगला तेवढ्या कारावासाची शिक्षा सुनावली. पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी केवळ ५ महिने कारागृहात होता. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्याचा एवढाच कारावास अंतिम ठरला आहे.ही घटना ११ फेब्रुवारी २०१८ रोजी घडली होती. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार, ती घरी आली तेव्हा आरोपी पीडित मुलीचा हात पकडून होता व त्याच्या पॅन्टची चेन उघडी होती. आरडाओरड केल्यानंतर आरोपी हा मुलीचा हात सोडून पळून गेला. त्यानंतर १२ फेब्रुवारी २०१८ रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. उच्च न्यायालयाने आरोपीची ही कृती लैंगिक अत्याचार ठरत नसल्याचे कायदेशीर तरतुद लक्षात घेता नमूद केले.निर्णयावर आक्षेपसमाजातील विविध घटकांकडून या निर्णयावरही आक्षेप घेतले जात आहेत. यापूर्वी सदर न्यायालयाने १९ जानेवारी रोजी अशाच प्रकरणात दिलेल्या वादग्रस्त निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने २७ जानेवारी रोजी स्थगिती दिली आहे. आरोपीने मुलीला निर्वस्त्र करून तिच्या छातीस स्पर्श केला नाही. त्यामुळे संबंधित कृती पोक्सो कायद्यातील लैंगिक अत्याचाराच्या व्याख्येत मोडत नाही, असा निष्कर्ष त्या निर्णयात नोंदवण्यात आला होता. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय