शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठाचे धडे ‘स्मार्टफोन’वर

By admin | Updated: November 5, 2014 00:56 IST

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने सकारात्मक पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना अगदी कुठेही, कधीही अभ्यास करता यावा यासाठी

कुलगुरू साळुंखे यांची माहिती : महागड्या अभ्यास साहित्याला ‘टॅब’चा पर्यायनागपूर: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने सकारात्मक पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना अगदी कुठेही, कधीही अभ्यास करता यावा यासाठी ‘स्मार्टफोन’च्या माध्यमातून शैक्षणिक धडे देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून काही निवडक अभ्यासक्रमांपासून ही ‘हायटेक’ सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी दिली.कुलगुरू डॉ. साळुंखे हे नागपूर विभागीय केंद्राच्या पाहणीसाठी उपराजधानीत आले होेते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आज ‘स्मार्टफोन’चे युग आहे. अनेक विद्यार्थ्यांकडे फोन उपलब्ध असतो. अशा स्थितीत त्यांना शिक्षकांचे धडे तसेच समुपदेशन थेट मोबाईलमार्फतच मिळण्याची सोय करण्यात येणार आहे असे साळुंखे यांनी सांगितले. शिवाय अनेक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना महागडे शिक्षण साहित्य विकत घ्यावे लागते. हे साहित्य ‘टॅब’च्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांकडे जुने अभ्यास साहित्य उपलब्ध असल्यास विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कातून अध्ययन साहित्याची रक्कम वजा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.शिक्षणाचा दर्जा टिकून रहावा यावर मुक्त विद्यापीठाकडून भर देण्यात येत आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या सुमारे १०० अभ्यासक्रमांची आतापर्यंत जवळपास ५०० पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अनेकदा विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेत पुस्तके उपलब्ध होत नाहीत. अशा स्थितीत त्यांना अभ्यासासाठी ‘आॅनलाईन’ पर्याय राहील, असे ते म्हणाले. मुक्त विद्यापीठाची ज्ञानगंगा जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागपूर विभागीय केंद्रात यंदाच्या वर्षी ५७ हजार ५१७ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. परंतु यावर मी समाधानी नसून हा आकडा एक लाखाच्या वर गेला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. विभागीय केंद्राचे संचालक डॉ. रमेश सेनाड यावेळी उपस्थित होते.निकाल प्रक्रिया वेगवान करणारमुक्त विद्यापीठाचे निकाल वेळेवर लागत नाही, विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर लवकर उत्तर देण्यात येत नाही, अशा बाबी वारंवार दिसून येतात. त्यामुळे सर्व अभ्यासकेंद्रांच्या माध्यमातून अशा तक्रारी विभागीय संचालकांकडे येतील व लगेच त्यांचा निपटारा करण्यात येईल अशी यंत्रणा बसविण्यात येणार आहे. शिवाय परीक्षांची निकाल प्रक्रिया आणखी वेगवान करण्यावर भर आहे. आगामी वर्षापासून पुनर्मूल्यांकन पद्धत सुरू केली जाईल, असे डॉ.साळुंखे यांनी सांगितले. नागपुरात प्रशासकीय इमारत उभारण्यासंदर्भात विचार सुरू असून जिल्हा केंद्रदेखील उभारल्या जातील असे बोलून दाखविले. (प्रतिनिधी)वंचित घटकांसाठी १०० टक्के फी माफीमुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांत प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी १०० टक्के फी माफी देण्यात येणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. शासनाने यासंदर्भात ‘जीआर’ काढला होता व केंद्र शासनाकडून याअंतर्गत निधी देण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी याअगोदरच शुल्क भरले आहे, त्यांनी समाजकल्याण खात्याकडे सर्व कागदपत्रांसह ‘आॅनलाईन’ अर्ज दाखल केल्यास त्यांना शुल्काचा परतावा मिळेल, असे डॉ.साळुंखे यांनी स्पष्ट केले. शिक्षणापासून दुरावलेल्यांना उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार करण्यासाठी मुक्त विद्यापीठाचे शिक्षणक्रम अत्यंत उपयुक्त असून त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा यासाठी वंचित घटकातील विद्यार्थ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ मोठ्या प्रमाणात घेता यावा यासाठी भर देणार असल्याचे डॉ. साळुंखे म्हणाले.