शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मतदार नोंदणीसह उघडा अकॅडमिक क्रेडिट खाते; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा उपक्रम 

By जितेंद्र ढवळे | Updated: June 16, 2023 18:52 IST

Nagpur News पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशाकरिता नोंदणी करीत असताना विद्यार्थ्यांना मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यासह अकॅडमीक क्रेडिट खाते देखील उघडता येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने हा उपक्रम राबवित विद्यार्थ्यांकरीता ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

नागपूर : पदवी प्रथम वर्षाच्या प्रवेशाकरिता नोंदणी करीत असताना विद्यार्थ्यांना मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यासह अकॅडमीक क्रेडिट खाते देखील उघडता येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने हा उपक्रम राबवित विद्यार्थ्यांकरीता ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रथम वर्ष प्रवेशाकरिता नोंदणी प्रक्रिया गुरुवार, दिनांक १५ जून २०२३ पासून सुरू करण्यात आली आहे. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात अव्यावसायिक महाविद्यालयांमध्ये पदवी प्रथम वर्षाला प्रवेश  घेण्याकरिता कार्यक्रम घोषित केला आहे. अव्यावसायिक महाविद्यालयातील पदवी (यूजी) स्तरावरील अभ्यासक्रमात प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्वप्रथम नोंदणी करावी लागणार आहे. मात्र, ही नोंदणी करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना त्यांचे नाव मतदार यादीमध्ये नोंदविणे गरजेचे आहे. नाव नोंदणी करण्याचा अर्ज भरीत अपलोड करणे गरजेचे आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदविले असल्यास त्याचे कागदपत्र यावेळी अपलोड करावे लागणार आहे. त्यानंतर अकॅडमीक बँक ऑफ क्रेडिट अकाउंट (एबीसी)चे खाते उघडावे लागणार आहे. मतदार नोंदणी आणि अकॅडमी बँक ऑफ क्रेडिट अकाउंट तयार केल्यानंतर प्रवेशाकरिता नोंदणीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होईल. विद्यापीठाच्या www.nagpuruniversity.ac.in संकेतस्थळावर याबाबत माहिती उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना गुरुवार, दिनांक १५ जून २०२३ ते ३ जुलै २०२३ पर्यंत विद्यापीठाच्या  या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागेल. विद्यार्थ्यांनी नोंदणी करीत सर्व कागदपत्रे अपलोड करावयाचे आहे. त्यानंतर झालेल्या नोंदणीची प्रिंट आऊट घेऊन संबंधित महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अडचणी आल्यास ८४५९३४३८७८, ७९७२०५४९८० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे व उपकुलसचिव (महाविद्यालय विभाग) डॉ. रमण मदने यांनी केले आहे. 

२५ महाविद्यालयांची संलग्नता गोठविली अकॅडमीक ऑडिट प्रपोजल सादर न केल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने परिक्षेत्रातील सद्यस्थितीत २५ महाविद्यालयांची संलग्नता गोठविली आहे. पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेताना या २५ महाविद्यालयांमध्ये प्रवेश अर्ज सादर न करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. संबंधित २५ महाविद्यालयांच्या नावांची यादी प्रवेश नोंदणी करणाऱ्या वेब पोर्टलवर देण्यात आली आहे. अकॅडमीक ऑडिट प्रपोजल सादर न केल्याने आणखी काही महाविद्यालयांची संलग्नता गोठविली जावू शकते. त्यामुळे अशा महाविद्यालयांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. शिवाय विद्यापीठाची संलग्नता कायम असलेल्या महाविद्यालयांची यादी देखील विद्यार्थ्यांकरीता त्याच ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. 

गुणवत्ता यादी महाविद्यालयात

१५ जून २०२३ ते ५ जुलै २०२३ पर्यंत  महाविद्यालयात प्रवेश अर्जासोबत नोंदणीची प्रत सादर करावयाची आहे. महाविद्यालयाने त्यांच्या स्तरावर विद्यापीठाने दिलेल्या एकरूप वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवून गुणवत्ता यादी तयार करीत प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांचे प्रवेश विद्यापीठाच्या वेबपोर्टलवर नोंदणी करून कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ