शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

‘सुपर’ ची ओपीडी म्हणजे गोंधळ ‘स्पेशल’

By admin | Updated: October 19, 2016 03:12 IST

रुग्णांची वाढती संख्या व रुग्ण हिताला प्राधान्य देऊन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध विभागांच्या बाह्यरुग्ण विभागाचे (ओपीडी) दिवस नुकतेच बदलविण्यात आले.

अपुरी जागा ठरत आहे कारण : रुग्णसंख्येतही दुपटीने वाढनागपूर : रुग्णांची वाढती संख्या व रुग्ण हिताला प्राधान्य देऊन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध विभागांच्या बाह्यरुग्ण विभागाचे (ओपीडी) दिवस नुकतेच बदलविण्यात आले. तसेच सोयीसाठी ओपीडीच्या रचनेतही बदल करण्यात आले. परंतु रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाल्याने ओपीडीची जागा अपुरी पडत आहे. नोंदणी कक्षाची रांग, तपासणीच्या प्रतीक्षेत बसलेले रुग्ण आणि औषधे घेणाऱ्यांची रांग एकाच ठिकाणी लागत असल्याने गोंधळ उडत आहे. याचा फटका गंभीर रुग्णांना बसत आहे. बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण व व्यसनाधिनतेमुळे विशेषत: हृदय, मेंदू व किडनी विकाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. याचा भार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवरही पडला आहे. सध्याच्या स्थितीत या रुग्णालयातून हृदयशल्य चिकित्साशास्त्र, (सिव्हीटीएस), हृदयरोग (कार्डिओलॉजी), मेंदूरोग (न्यूरोलॉजी), मज्जातंतूची शल्यक्रिया (न्यूरोसर्जरी), किडनीविकार (नेफ्रालॉजी), मूत्रपिंडरोग (युरोलॉजी) व पोटाचे विकार (गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी), एन्डोक्रेनॉलॉजी (मधुमेह) अशा आठ विभागातून रुग्णसेवा दिली जाते. रुग्णांची वाढती गर्दी लक्षात घेऊन व रुग्ण हिताच्या दृष्टीने आठही विभागाचे ओपीडीचे दिवस बदलविण्यात आले. ओपीडीच्या रचनेतही बदल करण्यात आला. परंतु गेल्या काही महिन्यांपासून रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्याने ओपीडीची जागा अपुरी पडत आहे. एकाच ठिकाणी रुग्णांची गर्दी वाढल्याने कुणाचा नंबर आला याची माहिती रुग्णांपर्यंत पोहचत नाही. परिणामी, रुग्णारुग्णांमध्ये भांडणे वाढली आहेत. गंभीर रुग्णांना याचा फटका बसत आहे. डॉक्टरही या गोंधळामुळे त्रासले असून ओपीडीमध्ये महत्त्वाचे बदल करणे आवश्यक असल्याचे बोलत आहे. (प्रतिनिधी)