शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
2
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
3
MTNL Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
4
सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
5
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
6
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
7
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची मानसिक अवस्था बिघडली, रस्त्यावर भयानक अवस्थेत सापडली
8
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
9
कंबर, मान, खांद्यामध्ये असह्य वेदना; दुर्मिळ आजारामुळे १२ किलोने वाढला स्तनांचा आकार
10
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
11
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
12
भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश
13
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
14
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
15
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
16
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
17
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
18
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
19
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
20
सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!

फक्त बोर्डावरच ‘नो हॉकिंग झोन’

By admin | Updated: March 6, 2016 02:52 IST

सीताबर्डीतील मुख्य सिमेंट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांची दुकाने लागतात. दुचाकी जायलाही रस्ता उरत नाही.

सीताबर्डीतील दुकानदार आंदोलनाच्या पवित्र्यात : भ्रष्टाचाराचा संकेत देतोय रस्तानागपूर : सीताबर्डीतील मुख्य सिमेंट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांची दुकाने लागतात. दुचाकी जायलाही रस्ता उरत नाही. या रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाल्यांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणजेच ‘नो हॉकिंग झोन’ असे बोर्ड लागले आहेत. कोणत्या वेळेत फेरीवाल्यांनी येथे राहू नये, याची वेळही नमूद केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे संबंधित बोर्ड लागलेल्या भागातच सर्वाधिक हॉकर्सची गर्दी पाहायला मिळते. काही फेरीवाल्यांनी तर या बोर्डावर आपले सामान टांगलेले पाहायला मिळते.फेरीवाल्यांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी असेलल्या यंत्रणेने या सर्व बाबींकडे डोळेझाक केली आहे. सन २००० मध्ये या रस्त्यावर फलक लावण्यात आले आणि तेव्हापासूनच येथे हॉकर्सची गर्दी वाढत गेली. एक बोर्ड व्हेरायटी चौकात लावण्यात आला. येथे वाहतूक पोलीस उपस्थित राहतात. दुसरा बोर्ड महाजन मार्केटजवळ आहे. मात्र, हा बोर्ड कधीकधीच पाहायला मिळतो. बहुतांश वेळी विक्रेत्यांनी झाकलेला असतो. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे स्थानिक दुकानदार निराश झाले आहेत. न्याय मिळत नसल्यामुळे सीताबर्डी मर्चंट असोसिएशनने आंदोलनाची तयारी चालविली आहे. वाहतूक पोलीस येथे वाहनचालकांवर ‘वन वे’ची कारवाई नियमितपणे करतात, पण फेरीवाल्यांवर कारवाई करताना मात्र दिसत नाही. आता का शक्य नाही?पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांच्या कार्यकाळात सीताबर्डीतील मुख्य रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सला हटविण्यात आले होते. तर मग आता कारवाई का होऊ शकत नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जात नाही. हॉकर्सचे परवाने रद्द करून त्यांना दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित करण्याची गरज आहे. जबाबदार अधिकारी व्यक्तिगत स्वार्थापोटी कारवाई करण्यापासून पळवाट शोधत आहेत, असेच चित्र आहे. - प्रदीप गुप्ता, उपाध्यक्ष, सीताबर्डी मर्चंट असोसिएशनआता आंदोलनच करूसीताबर्डीतील दुकानदारांची व्यथा ऐकून त्यांना न्याय देण्यासाठी शासकीय यंत्रणा हस्तक्षेप करण्यास तयार असल्याचे दिसत नाही. व्यापारी शांततेत आपला व्यवसाय करतात, हे कदाचित प्रशासनाला चांगले वाटत नसावे. त्यामुळे आता न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू आहे. इतर व्यापारी संघटनांशी संपर्क साधून कार्यक्रम आखला जात आहे. - हुसैन नूरअल्लाह अजानी,संयुक्त सचिव, सीताबर्डी मर्चंट असोसिएशन