शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जननी सुरक्षा योजनेचा केवळ देखावा

By admin | Updated: March 7, 2017 02:11 IST

शासनाने माता आणि बालमृत्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी जननी सुरक्षा योजना व जननी शिशू सुरक्षा योजना लागू केली.

अनेक माता योजनेपासून वंचित : औषधेही आणावी लागतात विकतनागपूर : शासनाने माता आणि बालमृत्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी जननी सुरक्षा योजना व जननी शिशू सुरक्षा योजना लागू केली. या योजनेंतर्गत मोफत प्रसूती, औषधोपचार व खात्यात थेट ६०० रुपये जमा करण्याची सोय आहे. परंतु मेडिकलमध्ये ही योजना राबविण्याचा देखावा केला जात आहे. अनेक लाभार्थ्यांना या योजनेची माहिती दिली जात नाही, उलट नातेवाईकांच्या हातात शस्त्रक्रियेचे साहित्य आणि औषध आणण्यासाठी ‘प्रीस्क्रीप्शन’ दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. शासकीय रुग्णालयांसह सर्वच आरोग्य केंद्रांत ही योजना शंभर टक्के राबविण्याचा केंद्र सरकारचे निर्देश आहेत. या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती-जमाती व दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. या वर्गातील गरोदर मातांना प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरच्या सर्व सेवा आरोग्य विभागामार्फत पुरविल्या जातात. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील रुग्णालयात प्रसूती झाल्यास ७०० तर शहरी भागातील शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास ६०० रुपये असा लाभ दिला जातो. हे पैसे थेट लाभार्थ्यांचा खात्यात जमा होतात. याशिवाय जननी शिशू या उपक्रमांतर्गत माता व बालकांच्या संपूर्ण उपचाराचा व आहाराचा भार सरकार उचलते. घर ते दवाखाना अशी सेवा त्यांना पुरविली जाते. त्यामुळे ही योजना लाभार्थ्यांसाठी वरदान ठरणे आवश्यक होते. परंतु मेडिकलमध्ये या योजनेला हरताळ फासला जात आहे.(प्रतिनिधी) योजनेची माहितीच दिली नाहीमेडिकलमध्ये दहा दिवसांपूर्वी प्रसूती झालेल्या महिलेचा पती लीलाधर जवादे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, गरोदरपणापासून मेडिकलच्या स्त्रीरोग व प्रसूती विभागामध्ये उपचार सुरू होते. प्रसूतीही झाली, परंतु कोणीच या योजनेची माहिती दिली नाही. यासंदर्भात एका परिचारिकेलाही विचारले होते, परंतु त्यावेळी त्या काहीच बोलल्या नाही शिवाय सलाईन्स, इंजेक्शनही बाहेरून विकत आणण्यासाठी चिठ्ठी लिहून दिली.