शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

केवळ आठ महाविद्यालयांना नॅकची ए प्लस श्रेणी; नागपूर विद्यापीठातील वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 10:47 IST

Nagpur News नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील केवळ आठ महाविद्यालयांना नॅकची ए प्लस ही श्रेणी प्राप्त आहे. जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचा दावा करणाऱ्या विद्यापीठाच्या डोळ्यात अंजन घालणारी ही बाब आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक ५६ महाविद्यालये बी श्रेणीत आहेत. एकूण महाविद्यालयांच्या तुलनेत ही टक्केवारी केवळ ११.०५ इतकी आहे. बी प्लसमध्ये २२ तर बी प्लस प्लस श्रेणीत २० महाविद्यालयांचा समावेश आहे. चारही जिल्ह्यांतील १६ महाविद्यालये सी श्रेणीत आहेत.

योगेश पांडे 

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : नागपूर विद्यापीठाने बृहत्‌ आराखड्यात २०२४ पर्यंत ८२ टक्के महाविद्यालये ‘नॅक’च्या श्रेणीत आणण्याचे ध्येय मांडले आहे. मात्र महाविद्यालयांकडूनच या संकल्पाला छेद देण्यात येत आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील केवळ आठ महाविद्यालयांना नॅकची ए प्लस ही श्रेणी प्राप्त आहे. जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचा दावा करणाऱ्या विद्यापीठाच्या डोळ्यात अंजन घालणारी ही बाब आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या ५०७ पैकी केवळ ३० टक्के महाविद्यालयेच सद्यस्थितीत नॅकच्या श्रेणीत आहेत. १५२ महाविद्यालयांपैकी केवळ १.५८ टक्के महाविद्यालये नॅकच्या ए प्लस श्रेणीत येतात तर २६ महाविद्यालये ए श्रेणीत आहेत. यात प्रामुख्याने विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेशी संबंधित महाविद्यालयांचा समावेश आहे.

एकाही महाविद्यालयाला सर्वोच्च श्रेणी नाही

महाविद्यालयांमधील सोयी, पायाभूत सुविधा, शिक्षणाचा दर्जा, संशोधनाची व्याप्ती, शिक्षकांची कामगिरी इत्यादींच्या आधारावर नॅकच्या चमूकडून मू्ल्यमापन करण्यात येते व प्राप्त सीजीपीएच्या आधारावर विविध श्रेणी देण्यात येतात. ए प्लस प्लस ही सर्वोच्च श्रेणी मानली जाते. परंतु नागपूर विद्यापीठातील एकाही महाविद्यालयाला ही सर्वोच्च श्रेणी प्राप्त नाही.

सर्वाधिक महाविद्यालये नागपूर जिल्ह्यातील

नागपूर जिल्ह्यातील सर्वात जास्त ११५ महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन झाले आहे. सात महाविद्यालयांना ए प्लस ही श्रेणी प्राप्त आहे. २३ महाविद्यालयांना ए, २० महाविद्यालयांना बी प्लस प्लस ती ४० महाविद्यालयांना बी श्रेणी प्राप्त आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्वात कमी महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन झाले असून ही संख्या केवळ सहा इतकी आहे.

श्रेणीनिहाय महाविद्यालये

नॅकची श्रेणी - महाविद्यालयांची संख्या

ए प्लस प्लस - ०

ए प्लस - ८

बी प्लस प्लस - २२

बी प्लस - २०

बी - ५६

सी - १६

जिल्हानिहाय महाविद्यालये

जिल्हा - विविध श्रेणी असलेली महाविद्यालये

नागपूर - ११५

वर्धा - २२

गोंदिया - ९

भंडारा - ६

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ