शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

नक्षलग्रस्त गडचिरोलीत केवळ ८ हजार ३२९ किमीचेच रस्ते

By admin | Updated: July 4, 2014 01:07 IST

या नक्षलग्रस्त जिल्ह्यात केवळ ८३२९.७६ किमी लांबीच्याच रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते विकासाचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. रस्ते व पुलांच्या बांधकामाला

बीआरओ गेले : रस्त्यांची कामे नक्षलवाद्यांमुळेही रखडलीगडचिरोली : या नक्षलग्रस्त जिल्ह्यात केवळ ८३२९.७६ किमी लांबीच्याच रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते विकासाचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. रस्ते व पुलांच्या बांधकामाला नक्षलवाद्यांचा कायम विरोध राहत असल्याने दुर्गम भागात रस्ते विकासाचे काम करणे कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभाग या दोघांसाठीही अडचणीचे ठरत आहे.२६ आॅगस्ट १९८२ ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली हा नवा जिल्हा निर्माण करण्यात आला. त्याच वेळी जिल्ह्यात नक्षलवादी चळवळीचाही उदय झाला. नक्षलवाद्यांची पाळेमुळे अल्पावधीतच भक्कमपणे रोवल्या गेली. त्यांनी विकासाला कायम विरोध केला आहे. रस्ते, पूल, मोबाईल टॉवर उभारणीच्या कामालाही नक्षलवाद्यांचा विरोध आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ८३२९.७५ किमी लांबीचेच रस्ते होऊ शकले. यामध्ये ५० किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग, १३०५.१५ किमी लांबीचा राज्य महामार्ग, ९२९.४८ किमी लांबीचा मोठा जिल्हा मार्ग, १३५२.९९ किमी लांबीचे अन्य जिल्हा मार्ग व ४६९२.१२ किमी लांबीचे व्हिलेज रस्ते पूर्ण करण्यात आले. जिल्ह्याच्या आदिवासीबहुल भागात १४१०७ चौ.किमी, गैर आदिवासीबहुल भागात १३२७.०० चौ. किमी तर जंगलव्याप्त भागात १३२०० चौ. किमी लांबीचे रस्ते निर्माण करण्यात आले. रस्ते उभारण्यासाठी १९८५ नंतर सीमासडक संघटन (बीआरओ)ला आणण्यात आले होते. त्यांनी एटापल्ली, भामरागड आदी भागात रस्ते व पूल उभारणीचे काम केले. भामरागड तालुक्यात पामुलगौतम नदीवर धोडराजवळील पूल तर एटापल्ली येथे बांडे नदीवर मोठा पूल उभारला. याशिवाय रस्त्यांचीही अनेक कामे पूर्ण केली. २०१२ मध्ये जिल्ह्यातून बीआरओने आपला गाशा गुंडाळला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हे काम सोपविण्यात आले. २००९ मध्ये नक्षलवाद्यांनी अनेक बांधकाम व्यावसायिकांची हत्या केली त्यामुळे रस्ते विकासाच्या कामाची गती मंदाविली. आजही जवळजवळ १५ ते २० कामे बंद पडून आहेत. अनेक कामांना कंत्राटदार मिळेनासे झाले आहेत. नक्षलवाद्यांकडून कंत्राटदारांची वाहने जाळल्याच्याही घटना गेल्या ५ वर्षांत वाढल्या आहेत. या घटनांमध्ये सुमारे ४ कोटी रूपयाची हानी झालेली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)