शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएचडी’ नोंदणीसाठी केवळ २९१ अर्ज

By admin | Updated: January 18, 2017 02:22 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ‘पेट’चे दोन अवघड टप्पे

नागपूर विद्यापीठ : ‘पेट’मध्ये यशस्वी ठरलेल्यांची नोंदणीकडे पाठ नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ‘पेट’चे दोन अवघड टप्पे पार करताना अनेकांची दमछाक झाली. मात्र हे टप्पे पार केल्यानंतरदेखील अनेक उमेदवारांनी नोंदणीकडे पाठच फिरविली. नोंदणीसाठी २९१ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा फारच कमी आहे. प्रथम वस्तुनिष्ठ ‘आॅनस्क्रीन’ परीक्षा व त्यानंतर पात्र ठरल्यास लेखी परीक्षा या दोन टप्प्यांत ‘पेट’ होणार झाली. ‘पेट’च्या पहिल्या टप्प्यासाठी ३७७१ उमेदवारांना परीक्षा प्रवेशपत्र पाठविण्यात आले. यापैकी ३४४८ उमेदवारांनीच परीक्षा दिली व त्यातील ८९७ म्हणजेच सुमारे २६ टक्के परीक्षार्थी दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरले होते. यातील ३६९ उमेदवार उत्तीर्ण झाले होते. १६ जानेवारीपर्यंत या उमेदवारांना नोंदणीसाठी ‘आॅनलाईन’ अर्ज करायचे होते. शिवाय न्यायालयाच्या निर्णयानंतर अगोदर ‘पेट’ उत्तीर्ण झालेले उमेदवारदेखील नोंदणी करू शकणार होते. यापैकी केवळ २९१ उमेदवारांनीच प्रत्यक्षात ‘आॅनलाईन’ अर्ज केले आहेत, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. २० तारखेपर्यंत उमेदवारांना अर्ज व कागदपत्रांची ‘हार्ड कॉपी’ सादर करायची आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नोंदणी प्रक्रियेतील उमेदवारांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी) अभियांत्रिकीच्या उमेदवारांचे जास्त प्रमाण साधारणत: ‘पीएचडी’शाठी कला व विज्ञान शाखेतील उमेदवारांचा सर्वात जास्त कल असतो असा समज आहे. मात्र अभियांत्रिकीच्या उमेदवारांनी हा समज खोडून काढला. अभियांत्रिकीच्या ८२ उमेदवारांनी नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. त्याखालोखाल विज्ञान (६४) व वाणिज्य (६०) शाखेत अर्ज आले आहेत.