शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वेक्षणासाठी आशा स्वयंसेविकांना फक्त २० रुपये मानधन !

By गणेश हुड | Updated: May 17, 2024 15:16 IST

Nagpur : आरोग्य विभागाचे मानधन वाढीसाठी उपसंचालकांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :नागपूर शहर परिसरातील विविध नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांत कार्यरत असलेल्या परिचारिका व आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जात आहे. यासाठी आशा स्वयंसेविकांना दर दिवसाला २० रुपये मानधन  मिळत आहे. ही रक्कम नगन्य नसल्याने ३०० रुपये मानधन देण्याची मागणी मनपा अस्थायी आरोग्य कर्मचारी संघटनेने केली होती. त्यानुसार मनपाच्या आरोग्य विभागाने मानधन वाढीसाठी आरोग्य सेवा सहसंचालक (क्षयरोग) पुणे यांना पत्र पाठवले आहे. 

सर्वेसाठी आशांना दिवसाला २० रुपये मानधन मिळत आहे. दिवसाला अंदाजे ३० घरांचे सर्वेक्षण केले तर एका घरासाठी ६५ पैसे आशाला मिळतात. सातव्या वेतन आयोगाच्या काळात दिवसाला २० रुपये मानधन ही कल्पनाही करता येत नाही. त्यामुळे किमान ३०० रुपये मानधन देण्यात यावे. तसेच मे महिन्यात कडक ऊन असल्याने सर्वेक्षण एक महिना लांबणीवर टाकण्यात यावे, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष जम्मू आनंद यांनी केली होती. त्यानुसार महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलेकर यांनी संघटनेच्या आशा वर्कर यांची बैठक घेतली. पाचपावली केंद्रातील आशा कर्मचाऱ्यांना उन्हात सर्वे केल्याने चक्कर येवून डोके दुखी व उलट्या होत असल्याचे कर्मचाऱ्यांनी निदर्शनास आणले. यावर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. मानधन वाढीचा व सर्वेक्षण पुढे ढकलण्याबाबत निर्णय घेणे शासनाच्या अधिकारात असल्याने याबाबत डॉ. दीपक सेलोकर यांनी आरोग्य उपसंचालकांना पत्र पाठवल्याची माहिती जम्मू आनंद यांनी दिली. यावेळी जम्मू आनंद यांच्यासह रेश्मा अडागळे, इंदिरा गोटाफोडे, ज्योती कावरे, भाग्यश्री फुलबांडे, सुधा केळकर, देविना रेंडके, अश्विनी सोनवणे, पूनम फुलझाळे, भारती वर्मा, सारिका अवधूत, यमुना टेकम, संगीता टेकाम व मोठ्या संख्येने आशा वर्कर्स उपस्थित होत्या.

टॅग्स :nagpurनागपूर