शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

विषारी किटकनाशक फवारणीत मृत्युमुखी पडलेल्या ५१ पैकी फक्त १८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनाच मिळणार विमा संरक्षणाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 18:09 IST

जुलै ते आॅक्टोबर या चार महिन्यांच्या कालावधीत विषारी कीटकनाशकांच्या फवारणीमुळे राज्यातील ५१ शेतकरी-शेतमजुरांना आपला जीव गमवावा लागला. मात्र प्रशासकीय प्रक्रियेचा फटका त्यांना बसला असून केवळ १८ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांंनाच विमा संरक्षणाचा लाभ देण्यासाठीचे प्रस्ताव विमा कंपनीकडे दाखल करण्यात आलेले आहे.

ठळक मुद्देइतरांबाबत शासनाची भूमिका तरी काय ?प्रशासनातील अधिकाऱ्यांवर ठपका

आॅनलाईन लोकमतयोगेश पांडेनागपूर : जुलै ते आॅक्टोबर या चार महिन्यांच्या कालावधीत विषारी कीटकनाशकांच्या फवारणीमुळे राज्यातील ५१ शेतकरी-शेतमजुरांना आपला जीव गमवावा लागला. या सर्वांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत मिळणे अपेक्षित होते. मात्र प्रशासकीय प्रक्रियेचा फटका त्यांना बसला असून केवळ १८ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांंनाच विमा संरक्षणाचा लाभ देण्यासाठीचे प्रस्ताव विमा कंपनीकडे दाखल करण्यात आलेले आहे. इतर मृत शेतकरी व शेतमजुरांबाबत शासनाची नेमकी भूमिका तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.धनंजय मुंडे, प्रकाश गजभिये, हेमंत टकले, सुनील तटकरे इत्यादी सदस्यांनी विधान परिषदेत यासंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान प्रश्न उपस्थित केला होता. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. राज्यातील यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, धुळे या जिल्ह्यांत कापूस व सोयाबीन या पिकांवर जुलै ते आॅक्टोबर या महिन्यात कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली. ही फवारणी करताना ५१ शेतकरी-शेतमजुरांचा मृत्यू झाला. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २१ शेतकरी-शेतमजुरांना जीव गमवावा लागला. तर ७८३ जणांना विषबाधा झाली.विषारी कीटकनाशकांमुळे मृत झालेल्या १८ शेतकरी कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांच्या रकमेचा विमा संरक्षणाचा लाभ देण्यासाठी विमा कंपनीकडे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहे, असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. मात्र उर्वरित ३३ जणांच्या कुटुंबीयांना कशा प्रकारची आर्थिक मदत करण्यात आली, याची कुठलीही माहिती शासनाने दिलेली नाही.

अधिकाऱ्यांनीच केली कर्तव्यात कसूरदरम्यान, जुलैपासून कीटकनाशकांच्या दाहकतेचे शेतकऱ्यांना जीवघेणे चटके लागत असल्याची बाब लक्षात आल्यानंतरदेखील अधिकाऱ्यांनी शासनाला काहीच कळविले नव्हते, असे आरोप विरोधकांकडून होत होते. राज्य शासनानेदेखील ही बाब मान्य केली असून गृह, कृषी, सार्वजनिक आरोग्य, ग्रामविकास व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विषबाधेबाबतचा अहवाल वरिष्ठ पातळीवर सादर केला नसल्याचे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाकडून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :agricultureशेती