शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

राजकारण म्हणजे शत्रुंमधील युद्ध नव्हे, विवेक पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 09:58 IST

RSS Mohan Bhagwat Nagpur News स्पर्धा निकोप व्हायला हवी व त्यामुळे समाजात कटुता निर्माण होऊ नये. अशा स्थितीचा लाभ देशात कलह निर्माण करणारे देशविदेशातील तत्व घेतात याची जाण सर्वांनी ठेवली पाहिजे, असे परखड मत सरसंघचालकांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देऑनलाईन भाषणात सरसंघचालकांनी टोचले राजकारण्यांचे कान मर्यादित उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सद्यस्थितीत देशातील राजकारणाच्या स्तराबाबत अप्रत्यक्षपणे चिंता व्यक्त करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी सर्वपक्षीय नेत्यांचे कान टोचले आहेत. सत्ताप्राप्तीसाठी प्रयत्न करणे यात नवीन काही नाही. मात्र त्या प्रक्रियेत विवेकाचे पालन आहे. राजकारणातील स्पर्धा ही शत्रूंमध्ये चालणारे युद्ध नाही. स्पर्धा निकोप व्हायला हवी व त्यामुळे समाजात कटुता निर्माण होऊ नये. अशा स्थितीचा लाभ देशात कलह निर्माण करणारे देशविदेशातील तत्व घेतात याची जाण सर्वांनी ठेवली पाहिजे, असे परखड मत सरसंघचालकांनी व्यक्त केले. कोरोनाचा संसर्ग असल्याने रेशीमबाग मैदानाऐवजी डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात आयोजित संघाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवादरम्यान ऑनलाईन उद्बोधनादरम्यान ते बोलत होते.

विविधतेत एकता ही भारताची ताकद आहे. मात्र अल्पसंख्यांक तसेच अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांमध्ये द्वेषपूर्ण गोष्टी पसरवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. 'भारत तेरे टुकडे होंगे' अशा घोषणा देणारे लोक या कारस्थानी मंडळींमध्ये सहभागी आहेत. शासन-प्रशासनाच्या कुठल्या निर्णयावर किंवा समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांवर विरोध दर्शवत असताना राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव व सन्मान ठेवला पाहिजे. असे सरसंघचालक म्हणाले. यावेळी मंचावर विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, सहसंघचालक श्रीधर गाडगे उपस्थित होते.अतिथी, पथसंचलन व कवायती नाहीतकोरोनामुळे यंदा पथसंचलन व कवायती झाल्याच नाही. शिवाय यंदा कुठल्याही अतिथींनादेखील निमंत्रित करण्यात आले नव्हते. सभागृहात केवळ ५० पदाधिकारी, स्वयंसेवक व घोष पथकातील सदस्य उपस्थित होते. स्वयंसेवकांनी घराजवळच गटनिहाय विजयादशमी उत्सव साजरा केला.तर हिंदूऐवजी दुसरा शब्द वापराफुटीरतावादी व समाजाला तोडण्याचा प्रयत्न करत असलेले तत्व जाणुनबुजून ह्यहिंदुत्वाला ह्य तिरस्कार व टीकेचा पहिला निशाणा बनवितात. हिंदू कोणताही पंथ, संप्रदाय, जाती किंवा प्रांताचा पुरस्कार करणारा नसून सर्वांना जोडणारा शब्द आहे. या शब्दावर कुणालाही आक्षेप असू शकतो. आशय सारखा असेल तर इतर शब्दांच्या उपयोगावर आम्हाला कुठलाही आक्षेप नाही, असे डॉ.मोहन भागवत यांनी प्रतिपादन केले.मोदी सरकारची थोपटली पाठस्वदेशी, स्वावलंबन, नवीन शिक्षण धोरण या मुद्दयांवर सरसंघचालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारची पाठ थोपटली. शासनाचे कामकाज पारदर्शक असून जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याची क्षमता सरकारमध्ये आहे

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत