शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून ऑनलाईन पदव्युत्तर प्रवेशप्रक्रियेला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे अखेर पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे अखेर पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. यंदादेखील केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया राहणार असून, २७ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत. यंदाची प्रवेशप्रक्रिया तीन फेऱ्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. अंतिम वर्षाचे निकाल जाहीर झाल्यावरदेखील प्रवेशप्रक्रिया का जाहीर होत नाही, असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत होता व ‘लोकमत’ने देखील हा मुद्दा लावून धरला होता.

ही प्रवेशप्रक्रिया एमए, एमए (मास कम्युनिकेशन), एमकॉम, एमएस्सी, एमएस्सी (गृहविज्ञान), एमएफए (मास्टर ऑफ फाईन आर्ट्स), एमलिब (मास्टर ऑफ लायब्ररी सायन्स), एलएलएम (मास्टर ऑफ लॉ) या अभ्यासक्रमांसाठी ही प्रक्रिया असेल.

विद्यार्थ्यांना २७ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे. तर ९ सप्टेंबर रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. पहिल्या फेरीतील पसंतीक्रम ९ ते ११ सप्टेंबर या कालावधीत सादर करता येतील. दुसऱ्या फेरीतील पसंतीक्रम १७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत भरता येतील. तर तिसरी व अखेरची असलेली समुपदेशन फेरी २८ सप्टेंबर रोजी पार पडेल.

हेल्पलाईन क्रमांकच नाही

विद्यापीठाने केवळ प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जारी केले आहे. मात्र प्रवेशादरम्यान कुठली कागदपत्रे अपलोड करायची आहेत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र आहेत का, अडचण आल्यास कुठे संपर्क साधायचा, याची कुठलीही माहिती देण्याची तसदी घेण्यात आलेली नाही. कमीतकमी प्रवेशप्रक्रियेसंबंधी प्रश्नांच्या निराकरणासाठी हेल्पलाईन क्रमांक तरी जारी करायला हवा होता, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

असे आहे वेळापत्रक

ऑनलाईन अर्ज दाखल करणे- २७ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर (सायं ५)

तात्पुरती गुणवत्ता यादी-६ सप्टेंबर

आक्षेप-६ ते ७ सप्टेंबर

अंतिम गुणवत्ता यादी-९ सप्टेंबर

पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम-९ ते ११ सप्टेंबर

जागांची वाटप यादी - १३ सप्टेंबर (दुपारी ३ वाजता)

महाविद्यालयात रिपोर्टिंग - १३ ते १६ सप्टेंबर

पहिल्या यादीतील रिक्त जागा- १७ सप्टेंबर

दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम- १७ ते १९ सप्टेंबर

जागांची वाटप यादी - २१ सप्टेंबर

महाविद्यालयात रिपोर्टिंग - २१ ते २४ सप्टेंबर

दुसऱ्या फेरीतील रिक्त जागा- २५ सप्टेंबर

समुपदेशन फेरी- २८ सप्टेंबर

शैक्षणिक वर्गांना सुरुवात - २४ सप्टेंबर