शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन शिक्षणामुळे चुकीच्या मार्गाने पडतेय विद्यार्थ्यांचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोना आला आणि शाळा बंद पडल्या. सरकारने शिक्षण बंद होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला. पण ...

नागपूर : कोरोना आला आणि शाळा बंद पडल्या. सरकारने शिक्षण बंद होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला. पण आज या ऑनलाईन शिक्षणाने पालकांना घोर लावला आहे. विद्यार्थ्यांचे पाऊल चुकीच्या मार्गावर पडत आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांची प्रेमप्रकरणे वाढली आहे. विद्यार्थीदशेत गुन्हेगारीचे गालबोट लागले आहे. अशा तक्रारी शाळांशाळांमध्ये वाढल्या आहेत. बहुतांश तक्रारी स्लम वस्तीतील व ग्रामीण भागातील आहे. पालकांनी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मोबाईल घेऊन दिला पण विद्यार्थ्यांकडून त्याचा दुरुपयोग होऊ लागला.

- अशा आहेत तक्रारी

१) ती सातव्या वर्गात आहे. आईवडील मजुरीला जातात. मुलीचा ऑनलाईन क्लास आहे म्हणून वडिलांनी मुलीला मोबाईल दिला. ही सातव्या वर्गातील मुलगी एका २८ वर्षाच्या मुलाच्या प्रेमात पडली. तो मुलगा मध्यरात्री २ वाजता घरापुढे आला. मुलीने दरवाजा उघडला. पण आईला जाग आल्याने प्रकरण उघडकीस आले.

२) ती नवव्या वर्गाची विद्यार्थिनी, भावाच्या मोबाईलवरून ऑनलाईन क्लासमध्ये नियमित असायची. वर्गातीलच मुलांनी तिला ऑनलाईन क्लासमध्ये अश्लील मॅसेज टाकणे सुरू केले. तिने भावाकडे तक्रार केली. भावाने वडिलांना सांगितले. वडिलांनी मुलाला मारहाण केली. आता तो मुलगा धमक्या देतोय. वडिलांनी मुलीचे शाळेतून नाव काढण्यासाठी अर्ज केलाय.

३) ती नवव्या वर्गात आहे. शहरातील स्लम वस्तीत राहते. तिला वडील नाही. आई घरकाम करते. ऑनलाईन शिक्षणासाठी आईने तिला मोबाईल घेऊन दिला. मोबाईलद्वारे तिची एका व्यक्तीशी ओळख झाली. अभ्यासाऐवजी ती त्याच्याशी बोलायची. त्याने रंगबेरंगी स्वप्न तिला दाखविली. सोमवारी तिने घरातून पळ काढला.

४) ती अवघी १५ वर्षाची. शिक्षणाच्या नावावर मोबाईल तिच्या हाती आला. ती स्वच्छंदी झाली. २६ वर्षाच्या एका मुलाच्या प्रेमात पडली. त्यातून गैरप्रकार झाले. लग्न होऊ शकत नसल्याने त्या दोघांनीही आत्महत्या केली.

५) ती १७ वर्षाची. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली तिला मोबाईल घेऊन दिला. घरच्यांनीही अभ्यास करते म्हणून लक्ष दिले नाही. ती एका मुलाच्या प्रेमात पडली. त्यातून गर्भवती झाली.

- पालकांची चिंता वाढली

या पाचही घटना अतिशय सामान्य घरातील मुलींच्या बाबतीत घडल्या आहे. मोलमजुरी करणारे मायबाप मुलांच्या शिक्षणासाठी धडपड करून साधनं घेऊन देतात. पण विद्यार्थी त्याचा दुरुपयोग करून भलत्याच मार्गाला लागतात. या घटनांच्या नोंदी पोलीस ठाण्यात झाल्या आहे. तर काही तक्रारी शाळांकडे आल्या आहेत. त्यामुळे पालकांच्या जीवाला घोर लागला आहे.

- शालेय शिक्षणात मोबाईलचा वापर करण्यावर बंधने घातली होती. आता तोच मोबाईल मुलांच्या हाती सहज आला आहे. त्यांना या गोष्टीचे वेड लागले आहे. आईवडील घरात नसतात. मुले ऑनलाईनच्या नावावर मोबाईलचा सर्रास दुरुपयोग करीत आहे. मोबाईलच्या दुष्परिणामाच्या तक्रारी शाळांत वाढल्या आहे. मुलांना या सर्वांचा छंद लागला आहे. भविष्यात शाळा सुरू झाल्यास मुलांना त्या छंदातून बाहेर काढणे शाळांपुढे आव्हान ठरणार आहे.

राजश्री उखरे, प्राचार्य

- आज शिक्षणाला दुसरा पर्याय उपलब्ध नाही. याचा अर्थ मुलांनी दुरुपयोग करावा असाही नाही. मुलांना खरे तर समजवून घ्यायला पाहिजे. पालकांनीही त्याची जाणिव करून द्यायला हवी. शिक्षकांनीही गैरप्रकारचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना सांगायला हवे. ऑनलाईनमुळे ज्या तक्रारी येत आहे. त्या चुकीच्या आहे.

भाग्यश्री अणे, प्राचार्य