शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन शिक्षणामुळे चुकीच्या मार्गाने पडतेय विद्यार्थ्यांचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 11:21 IST

Nagpur News ऑनलाईन शिक्षणाने पालकांना घोर लावला आहे. विद्यार्थ्यांचे पाऊल चुकीच्या मार्गावर पडत आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांची प्रेमप्रकरणे वाढली आहे. विद्यार्थीदशेत गुन्हेगारीचे गालबोट लागले आहे. अशा तक्रारी शाळांशाळांमध्ये वाढल्या आहेत.

ठळक मुद्दे शालेय शिक्षणात मोबाईलचा वापर करण्यावर बंधने घातली होती. आता तोच मोबाईल मुलांच्या हाती सहज आला आहे. त्यांना या गोष्टीचे वेड लागले आहे. आईवडील घरात नसतात. मुले ऑनलाईनच्या नावावर मोबाईलचा सर्रास दुरुपयोग करीत आहे. मोबाईलच्या दुष्परिणामाच्या तक्रारी शाळांत व

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना आला आणि शाळा बंद पडल्या. सरकारने शिक्षण बंद होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला. पण आज या ऑनलाईन शिक्षणाने पालकांना घोर लावला आहे. विद्यार्थ्यांचे पाऊल चुकीच्या मार्गावर पडत आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांची प्रेमप्रकरणे वाढली आहे. विद्यार्थीदशेत गुन्हेगारीचे गालबोट लागले आहे. अशा तक्रारी शाळांशाळांमध्ये वाढल्या आहेत. बहुतांश तक्रारी स्लम वस्तीतील व ग्रामीण भागातील आहे. पालकांनी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मोबाईल घेऊन दिला पण विद्यार्थ्यांकडून त्याचा दुरुपयोग होऊ लागला.

- अशा आहेत तक्रारी

१) ती सातव्या वर्गात आहे. आईवडील मजुरीला जातात. मुलीचा ऑनलाईन क्लास आहे म्हणून वडिलांनी मुलीला मोबाईल दिला. ही सातव्या वर्गातील मुलगी एका २८ वर्षाच्या मुलाच्या प्रेमात पडली. तो मुलगा मध्यरात्री २ वाजता घरापुढे आला. मुलीने दरवाजा उघडला. पण आईला जाग आल्याने प्रकरण उघडकीस आले.

२) ती नवव्या वर्गाची विद्यार्थिनी, भावाच्या मोबाईलवरून ऑनलाईन क्लासमध्ये नियमित असायची. वर्गातीलच मुलांनी तिला ऑनलाईन क्लासमध्ये अश्लील मॅसेज टाकणे सुरू केले. तिने भावाकडे तक्रार केली. भावाने वडिलांना सांगितले. वडिलांनी मुलाला मारहाण केली. आता तो मुलगा धमक्या देतोय. वडिलांनी मुलीचे शाळेतून नाव काढण्यासाठी अर्ज केलाय.

३) ती नवव्या वर्गात आहे. शहरातील स्लम वस्तीत राहते. तिला वडील नाही. आई घरकाम करते. ऑनलाईन शिक्षणासाठी आईने तिला मोबाईल घेऊन दिला. मोबाईलद्वारे तिची एका व्यक्तीशी ओळख झाली. अभ्यासाऐवजी ती त्याच्याशी बोलायची. त्याने रंगबेरंगी स्वप्न तिला दाखविली. सोमवारी तिने घरातून पळ काढला.

४) ती अवघी १५ वर्षाची. शिक्षणाच्या नावावर मोबाईल तिच्या हाती आला. ती स्वच्छंदी झाली. २६ वर्षाच्या एका मुलाच्या प्रेमात पडली. त्यातून गैरप्रकार झाले. लग्न होऊ शकत नसल्याने त्या दोघांनीही आत्महत्या केली.

५) ती १७ वर्षाची. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली तिला मोबाईल घेऊन दिला. घरच्यांनीही अभ्यास करते म्हणून लक्ष दिले नाही. ती एका मुलाच्या प्रेमात पडली. त्यातून गर्भवती झाली.

- पालकांची चिंता वाढली

या पाचही घटना अतिशय सामान्य घरातील मुलींच्या बाबतीत घडल्या आहे. मोलमजुरी करणारे मायबाप मुलांच्या शिक्षणासाठी धडपड करून साधनं घेऊन देतात. पण विद्यार्थी त्याचा दुरुपयोग करून भलत्याच मार्गाला लागतात. या घटनांच्या नोंदी पोलीस ठाण्यात झाल्या आहे. तर काही तक्रारी शाळांकडे आल्या आहेत. त्यामुळे पालकांच्या जीवाला घोर लागला आहे.

राजश्री उखरे, प्राचार्य

- आज शिक्षणाला दुसरा पर्याय उपलब्ध नाही. याचा अर्थ मुलांनी दुरुपयोग करावा असाही नाही. मुलांना खरे तर समजवून घ्यायला पाहिजे. पालकांनीही त्याची जाणिव करून द्यायला हवी. शिक्षकांनीही गैरप्रकारचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना सांगायला हवे. ऑनलाईनमुळे ज्या तक्रारी येत आहे. त्या चुकीच्या आहे.

भाग्यश्री अणे, प्राचार्य

टॅग्स :onlineऑनलाइन