शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

‘आर्मी ऑफिसर’ असल्याची बतावणी करून सेवानिवृत्ताची ऑनलाईन फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2022 19:14 IST

Nagpur News घर भाड्याने देण्याची ऑनलाइन जाहिरात देणाऱ्या सेवानिवृत्त व्यक्तीची एकाने ‘आर्मी ऑफिसर’ असल्याची बतावणी करून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

नागपूर : घर भाड्याने देण्याची ऑनलाइन जाहिरात देणाऱ्या सेवानिवृत्त व्यक्तीची एकाने ‘आर्मी ऑफिसर’ असल्याची बतावणी करून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सतीश चिमलवार (वय ६५, श्रीरामनगर) यांनी ‘ओएलएक्स’वर त्यांचे घर भाड्याने देण्यासंदर्भात जाहिरात दिली होती. त्याच त्यांचा मोबाईल क्रमांकदेखील होता. ती जाहिरात पाहून एका व्यक्तीने त्यांना फोन केला व ‘आर्मी ऑफिसर’ असल्याची बतावणी केली. दिल्लीतून कामठीत बदली झाल्याने तातडीने घर हवे असल्याचे त्याने सांगितले. त्याने लष्कराशी संबंधित त्याची कागदपत्रेदेखील चिमलवार यांना पाठविले. त्यामुळे त्यांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्याने दोन महिन्यांचे आगावू भाडे देण्याच्या नावाखाली १६ हजार रुपये पाठवितो असे सांगून एक रुपयाच पाठविला. चिमलवार यांनी एकच रुपया मिळाल्याचे सांगताच त्याने त्यांना पेटीएमचा क्यूआर कोड पाठविण्यास सांगितले. त्याने यस बँकेचा खाते क्रमांक व आएफसी कोड नमूद करून तो टाकण्यास सांगितले. चिमलवार यांनी तसे केले असता त्यांच्या खात्यातून १५ हजार ९९९ रुपये वळते झाले. चिमलवार यांनी त्याला ती रक्कम परत मागितली असता त्याने तशीच प्रक्रिया करण्यास सांगितली व त्यांच्या दोन बँक खात्यातून एकूण १ लाख ९१ हजार ९९६ रुपयांची रक्कम त्याच्या यस बँकेच्या खात्यात वळती करून घेतली. त्यानंतर त्याने फोनच बंद केला.

चिमलवार यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलीस ठाण्यात संबंधित बँक खातेधारकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चौकशीदरम्यान यस बँकेच्या खातेधारकाचे नाव मयंक नागर असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी