शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन फसवणूक ; मागवला स्मार्ट फोन, मिळाला खाली डबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 10:59 IST

आॅनलाईन स्मार्ट फोन खरेदी करणाऱ्या एका युवकाला खाली डबा पाठवून फसवण्यात आले.

ठळक मुद्दे२२ हजाराचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आॅनलाईन स्मार्ट फोन खरेदी करणाऱ्या एका युवकाला खाली डबा पाठवून फसवण्यात आले.प्रेमचंद राऊत रा. सरस्वतीनगर, हुडकेश्वर असे फिर्यादीचे नाव आहे. प्रेमचंद एमआर आहे. ११ जानेवारी रोजी त्याने इंटरनेट साईटवर आय फोन विक्रीची जाहिरात पाहिली. जाहिरातीत दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधला. तेव्हा २२ हजार रुपयात मोबाईल खरेदीचा सौदा करण्यात आला. जाहिरात देणाऱ्याने तो जालना येथे पोलीस कर्मचारी असल्याचे सांगितले. त्याने प्रेमचंदला सांगितले की, त्याच्या भावाची प्रकृती खराब आहे. उपचारासाठी पैशाची गरज असल्याने तो मोबाईल विकत आहे. त्याने प्रेमचंदकडून मोबाईलची अर्धी रक्कम वसूल केली. यानंतर उर्वरित रक्कम पेटीएम करायला सांगितली. परंतु प्रेमचंदने मोबाईल हाती आल्यावर अर्धी रक्कम देईल, असे सांगितले. तेव्हा आरोपीने तो पोलीस कर्मचारी असून आपले आय कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड आदी सर्व सांगून डिलिव्हारीसाठी निश्चिंत राहण्यास सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून प्रेमचंदने २२ हजार रुपये जमा केले. १३ फेब्रुवारी रोजी प्रेमचंदला कुरिअरने पार्सल आले. उघडून पाहिले असता बॉक्स खाली होता. यानंतर जेव्हा प्रेमचंदने मोबाईलवर संपर्क साधला असता, त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. फसवले गेल्याचे लक्षात येताच प्रेमचंदने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान