शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम परवानगीसाठी एक खिडकी योजना

By admin | Updated: November 30, 2014 00:54 IST

शहरात कोणत्याही बांधकामासाठी महापालिकेकडून परवानगी घेण्यासाठी नागरिकांना खूप हेलपाटे खावे लागतात. नगर रचना विभागाच्या कार्यप्रणालीवर बऱ्याचदा प्रश्नचिन्ह लागले आहे.

बांधकाम तज्ज्ञांची उद्या बैठक : अभियंते करणार इतर मनपांचा दौरा ‘नागपूर : शहरात कोणत्याही बांधकामासाठी महापालिकेकडून परवानगी घेण्यासाठी नागरिकांना खूप हेलपाटे खावे लागतात. नगर रचना विभागाच्या कार्यप्रणालीवर बऱ्याचदा प्रश्नचिन्ह लागले आहे. या सर्वांवर उपाय म्हणून नागरिकांना त्वरित बांधकाम परवानगी मिळण्यासाठी येत्या काळात ‘एक खिडकी योजना’ राबविण्याचा मानस महापालिकेच्या स्थापत्य, विद्युत व प्रकल्प विशेष समितीचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी व्यक्त केला आहे.नागरिकांचे प्रश्न त्वरित सुटावे यासाठी महापालिकेने कार्यक्षम व लोकाभिमुख प्रशासन द्यावे, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी अनेकदा व्यक्त केली आहे. याची दखल नागरिकांना त्वरित बांधकाम परवानगी मिळण्यासाठी ‘एक खिडकी योजना’ कशी राबविता येईल, यावर स्थापत्य समिती अभ्यास करून प्रस्ताव सादर करणार आहे. समितीचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी सांगितले की, यासाठी महापालिका अभियंते ठाणे, अहमदाबाद, पुणे, नाशिक महापालिकेचा दौरा करून अभ्यासपूर्ण अहवाल तयार करतील. यासोबतच क्रेडई, आर्किटेक्ट, इंजिनिअर्स, टाऊनप्लॅनर्स असोसिएशन तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांसोबत १ डिसेंबर रोजी दुपारी १२.१५ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यांच्या सूचनांचा अंतर्भाव केला जाईल. याशिवाय ज्या नागरिकांचा या विषयाशी संबंध आहे त्यांनी त्यांच्या अडचणी व सूचना असल्यास १ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात उपस्थित रहावे. याशिवाय सामान्य नागरिकांना या विषयाशी संबंधित काही सूचना करायच्या असतील तर त्यांनी लेखी सूचनांसह दुपारी २ वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन संदीप जोशी यांनी केले आहे.