शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात गुंडाच्या टोळीकडून एकाची हत्या, दोघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 22:53 IST

दोन दिवसांपूर्वी मोटरसायकलचा धक्का लागल्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान गुंडाच्या एका टोळीने तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला चढवण्यात झाले. या हल्लयात एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देक्षुल्लक वादातून घडली घटना : पाचपावलीत प्रचंड तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन दिवसांपूर्वी मोटरसायकलचा धक्का लागल्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान गुंडाच्या एका टोळीने तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला चढवण्यात झाले. या हल्लयात एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. यामुळे पाचपावलीत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.दोन दिवसांपूर्वी मोटरसायकलचा धक्का लागल्याने आरोपी पिंटू सुरेश बेंडेकर आणि त्याच्या साथीदारांनी शूभम सदावर्ते, पवन गणेश धार्मिक (वय १८) तसेच पियुष आगडे या तिघांसोबत वाद घातला होता. त्यावेळी आरोपी बेंडेकरच्या कानशिलात लगावली होती. त्यामुळे तो शूभमवर चिडून होता. त्यावेळी हा वाद कसा बसा निपटला. गुरुवारी रात्री १० च्या सुमारास पाचपावली परिसरात आरोपी पिंटू बेंडेकर, त्याचा भाऊ जितेश बेंडेकर, आकाश माहुरे, बादल नरेश पडोळे, मंगेश उर्फ बजरंगी चिरोडकर, सुशांत उर्फ लल्ला सोनकुसरे, विक्की बुट्या, विक्की उर्फ कावळा, यश उर्फ दौला, कृष्णा आणि त्यांच्या ईतर साथीदारांनी शूभम, पियुष आणि पवन या तिघांना घेरले. त्यांना दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून शिवीगाळ करून आधी लाथाबुक्कयांनी आणि नंतर लोखंडी रॉड तसेच लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. त्यामुळे तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना डॉक्टरकडे नेले असता शूभम सदावर्ते याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच पोलिसांचा ताफाही पोहचला. त्यांनी घटनेची माहिती घेऊन पवन धार्मिकच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.गुन्ह्यात चार अल्पवयीनया हत्याकांडाचा सूत्रधार पिंटू बेंडेकर आहे. तो आणि त्याचा भाऊ हे दोघेही गुंड असून, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे पाचापावली पोलीस सांगतात. या दोन भावांनी आपली एक टोळी तयार केली असून, त्यात काही अल्पवयीन मुलांनाही सहभागी केले आहे. गुरुवारी रात्री आरोपी पिंटू आणि जितेशने सदावर्तेची हत्या केली त्यावेळी त्यांच्यासोबत चार अल्पवयीन आरोपीही होते. पोलिसांनी पिंटू आणि जितेशसह पाच जणांना अटक केली. ईतरांचा शोध सुरू आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून