शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दीड लाखांचे एक टन प्लास्टिक जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 19:26 IST

महाराष्ट्र शासनातर्फे प्रतिबंधित करण्यात आलेल्या प्लॉस्टिक पिशव्यांची अवैधरित्या वाहतूक करणारे वाहन वर्धा रोड चिचभवन येथे गुन्हे शाखा युनिट क्रमांक ४ द्वारे सोमवारी पकडण्यात आले.

ठळक मुद्देगुन्हे शाखा पथकाद्वारे कारवाई : उपद्रव शोध पथकाद्वारे दंड वसूल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र शासनातर्फे प्रतिबंधित करण्यात आलेल्या प्लॉस्टिक पिशव्यांची अवैधरित्या वाहतूक करणारे वाहन वर्धा रोड चिचभवन येथे गुन्हे शाखा युनिट क्रमांक ४ द्वारे सोमवारी पकडण्यात आले. गुप्त माहितीद्वारे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये सुमारे दीड लाख रुपये किंमतीचे प्लास्टिक जप्त करण्यात आले. महापालिकेच्या नेहरूनगर झोन उपद्रव शोध पथकाद्वारे वाहन चालकावर कारवाई करीत प्लास्टिक जप्त करून दंड वसुल करण्यात आला.वर्धा मागार्ने शासनाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक मालाची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखा युनिट क्रमांक ४ ला मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक पी.एम.मोहेकर व त्यांच्या सहका-यांनी वर्धा रोड चिचभवन येथे सापळा रचला. सदर मार्गावर वाहनांची झडती घेतली असता टाटा एस. वाहन क्रमांक एमएच ३२ क्यू ६०२१ या वाहनामध्ये शासनाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या आढळल्या. नंदनवन पोलिस स्टेशन पथकाद्वारे वाहन चालक गिरीश मुरलीधर अदानी (वय ३२ वर्षे) रा. पोतदार बगीचा, गुरूद्वारा रोड रामनगर जि. वर्धा व रवी मुरलीधर अदानी (वय ३० वर्षे) रा. पोतदार बगीचा, गुरूद्वारा रोड रामनगर जि. वर्धा यांच्यासह वाहनातील प्लास्टिकचा मुद्देमाल आणि वाहन ताब्यात घेण्यात आले.नंदनवन पोलिसाद्वारे उपद्रव शोध पथकाला कारवाईची माहिती देण्यात आली. नेहरूनगर झोनच्या सहायक आयुक्तांना पत्र देउन गाडी व प्रतिबंधित प्लास्टिक मुद्देमाल झोनच्या उपद्रव शोध पथकाच्या ताब्यात देण्यात आले. नेहरूनगर झोन उपद्रव शोध पथक प्रमुख नत्थु खांडेकर यांच्या नेतृत्वात पथकाने पंचनामा व जप्तीनामा नियमानुसार तयार करून संपूर्ण माल जप्त केला. प्लास्टिक जप्ती संदर्भातील नियमानुसार प्रथम गुन्ह्याकरीता पाच हजार रुपये दंड पथकाद्वारे वाहन चालकाकडून वसूल करण्यात आला.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका