शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

एकाला सात तर, दोघांना पाच वर्षे सश्रम कारावास

By admin | Updated: September 25, 2015 03:47 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तरुणाच्या हत्याप्रकरणातील एका आरोपीला सात वर्षे तर, दोन आरोपींना पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

हायकोर्ट : तरुणाचे अपहरण करून हत्यानागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तरुणाच्या हत्याप्रकरणातील एका आरोपीला सात वर्षे तर, दोन आरोपींना पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.प्रमोद ऊर्फ गज्जू कन्हय्यालाल शाहू (४२), रा. बजेरिया, मुकेश ऊर्फ मुसा रामशंकर शिवहरे (३७), रा. दौलतवाडी व राजकुमार केळाजी वानखेडे (५४), रा. वाडी अशी आरोपींची नावे आहेत. सत्र न्यायालयाने या आरोपींना भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेप व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावास तर, कलम ३६४ (अपहरण) अंतर्गत पाच वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली होती. एका आरोपीला निर्दोष सोडले होते. दोषी आरोपींनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रसन्न वराळे यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपींचे अपील अंशत: मंजूर करून सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल केला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, तिन्ही आरोपींना भादंविच्या कलम ३०२ ऐवजी कलम ३०४-२ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत दोषी ठरवून प्रमोदला सात वर्षे सश्रम कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावास तर, मुकेश व राजकुमारला पाच वर्षे सश्रम कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायालयाचा अन्य आदेश कायम ठेवण्यात आला आहे. मृताचे नाव राकेश शाहू होते. ७ डिसेंबर २००८ रोजी आरोपींनी राकेशचे अपहरण केले होते. यानंतर ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास कळमेश्वर पोलिसांच्या हद्दीतील एका शेतात राकेश जखमी अवस्थेत आढळून आला. राकेशला मेयो रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. आरोपींनी घरगुती वादातून राकेशला गंभीर मारहाण केली होती. गणेशपेठ पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला होता. आरोपींतर्फे वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी, अ‍ॅड. शशांक मनोहर व अ‍ॅड. आर. के. तिवारी तर, शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेश नायक यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)