शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

एक आरएफओ दोन वनपाल निलंबित

By admin | Updated: October 16, 2015 03:21 IST

दक्षिण उमरेड वन परिक्षेत्रातील चनोडा येथील रोपवन घोटाळ्याप्रकरणी वन विभागातर्फे संबंधित वन परिक्षेत्र ...

वन विभागात खळबळ : चनोडा येथील रोपवन घोटाळानागपूर : दक्षिण उमरेड वन परिक्षेत्रातील चनोडा येथील रोपवन घोटाळ्याप्रकरणी वन विभागातर्फे संबंधित वन परिक्षेत्र अधिकाऱ्यासह (आरएफओ) दोन वनपाल व एका वनरक्षकाविरुद्ध निलंबन करवाई करण्यात आली आहे. आरएफओ एस. बी. गोसावी, वनपाल पी. एम. खोरगडे, वनपाल एन. एस. वाडीझरे व वनरक्षक मुंडे अशी त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आहेत. यासंबंधी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) टी. एस. के. रेड्डी यांना विचारणा केली असता, त्यांनी संबंधित चौघांविरुद्ध निलंबन करवाई करण्यात आली असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, या घोटाळ््यासंबंधी ‘लोकमत’ ने सर्वप्रथम बातमी प्रकाशित करू न, या प्रकरणाचा भंडाफोड केला होता. या निलंबन कारवाईने वन विभागात चांगलीच खळबळ माजली आहे. माहिती सूत्रानुसार दक्षिण उमरेड वन परिक्षेत्रातील मौजा चनोडा येथील कक्ष क्र. ३६४ मधील १७२ हेक्टर क्षेत्रात रोपवन लागवडीच्या नावाखाली संबंधित अधिकाऱ्यांनी कोट्यवधीचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. जाणकारांच्या मते, येथील रोपवनाची सर्व कामे अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु येथे मजुरांना कमी दराने मजुरी देण्यात आल्याची माहिती आहे. शिवाय कोणत्याही प्रकारची बेसलाईन व ग्रेडलाईन न टाकता रोपवनाची कामे करण्यात आली. एवढेच नव्हे, तर संपूर्ण रोपवनासाठी एकूण ४ लाख ३० हजार खड्डे खोदून त्यासाठी ४१ लाख १९ हजार ४०० रुपयांची मजुरी देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मजुरांना केवळ १७ लाख २० हजार रुपयेच देऊन, इतर २३ लाख ९९ हजार ४०० रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी वन कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सिराज पटेल व निवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चिमोटे यांनी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) टी. एस. के. रेड्डी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्यावर रेड्डी यांनी विभागीय वन अधिकारी केवल डोंगरे यांच्या अध्यक्षतेखालील एक चौकशी समिती स्थापन केली होती. समितीने मागील महिन्यात या प्रकरणाची चौकशी करून सीसीएफ रेड्डी यांच्याकडे सादर केलेल्या अहवालावरून ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)