शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘बीसीसीए’ प्रथम सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एक प्रश्नच ‘मिसिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 12:41 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांमध्ये चुका सुरूच आहे. रविवारी तर एक वेगळीच चूक समोर आली. चक्क प्रश्नपत्रिकेत एक प्रश्नच नव्हता. यामुळे विद्यार्थी संतप्त झाले व परीक्षा केंद्रावरच त्यांनी गोंधळ घातला.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा परीक्षा केंद्रावर गोंधळ

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांमध्ये चुका सुरूच आहे. रविवारी तर एक वेगळीच चूक समोर आली. चक्क प्रश्नपत्रिकेत एक प्रश्नच नव्हता. यामुळे विद्यार्थी संतप्त झाले व परीक्षा केंद्रावरच त्यांनी गोंधळ घातला.सोमवारी ‘बीसीसीए’चा प्रथम सत्राचा ‘फंडामेन्टल कॉम्प्युटर’ या विषयाचा पेपर होता. यात प्रश्नपत्रिकेत १० प्रश्न असणे अनिवार्य होते. मात्र प्रत्यक्षात प्रश्नपत्रिकेमध्ये ९ प्रश्नच छापून आले होते. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना ही बाब लक्षात येताच, त्यांनी याची तक्रार पर्यवेक्षक व केंद्र अधिकाऱ्यांजवळ केली. त्यांनी विद्यार्थ्यांना कुठलीही मदत करण्यास नकार दिला. जो प्रश्न नाही, त्याला विसरून उर्वरित प्रश्न सोडविण्याची सूचना केली व विद्यार्थ्यांची तक्रार घेण्यास नकार दिला. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले व गोंधळ घातला. अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरेच लिहिली नाहीत. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा प्रकाराची कुठलीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले.विद्यार्थी किंवा केंद्र कुठूनही तक्रार आलेली नाही. जर तक्रार आली तर विचार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ.विनायक देशपांडे यांनीदेखील यासंदर्भात माहिती नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे हा पेपर २४ मार्च रोजी होणार होता. मात्र दीक्षांत समारंभामुळे हा पेपर १५ एप्रिल रोजी घेण्यात आला.

‘कॉमर्स’मध्येच चुका का?यंदाच्या उन्हाळी परीक्षांमध्ये सर्वात जास्त चुका वाणिज्य व व्यवस्थापन शाखेअंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांमध्येच दिसून येत आहे. अगोदर ‘बीबीए’ अंतिम वर्ष व त्यानंतर ‘बीकॉम’ अंतिम वर्ष व ‘एमकॉम’ द्वितीय सत्राच्या प्रश्नपत्रिकेतदेखील त्रुटी आढळून आल्या. परीक्षा विभागाने ही बाब गंभीरतेने घेतलेली नाही. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ