शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पाळीव कुत्र्यास ठार केल्यावरून एकाचा खून

By admin | Updated: May 26, 2016 03:07 IST

पाळलेल्या कुत्र्यास विषारी औषध खाऊ घातल्याच्या कारणावरून उद्भवलेला वाद विकोपास गेला आणि त्याचे पर्यवसान भांडणात झाले.

तिघांना अटक : डोंगरमौदा येथील घटना कुही : पाळलेल्या कुत्र्यास विषारी औषध खाऊ घातल्याच्या कारणावरून उद्भवलेला वाद विकोपास गेला आणि त्याचे पर्यवसान भांडणात झाले. याचा वचपा घेण्यासाठी तिघांनी घरी खाटेवर झोपलेल्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार करीत त्याला गंभीर जखमी केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना कुही तालुक्यातील वेलतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या डोंगरमौदा येथे मंगळवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. परमानंद विश्वनाथ सोमकुवर (४१, रा. डोंगरमौदा, ता. कुही) असे मृताचे तर संतन कार्तिक शेंडे (३२), भीमराव अभिमन्यू गोंडाने (५०) व हरी देवराव गोस्वामी (३९) तिघेही रा. डोंगरमौदा, ता. कुही अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. परमानंद सोमकुवर यांच्या पाळीव कुत्र्यास कुणीतरी विषारी पदार्थ खायला घातले. त्यामुळे कुत्र्याचा तडफडून मृत्यू झाला. परिणामी, परमानंद आणि भीमराव गोंडाने याची पत्नी यांच्यात भांडणही झाले. स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करून सदर भांडण मिटविले. दरम्यान, परमानंद हा मंगळवारी रात्री त्याच्या घरी खाटेवर झोपला होता. त्यात संतन, भीमराव व हरी हे तिघेही त्याच्या घरावर चालून आले. काही कळण्याच्या आत तिघांनी परमानंदवर गुप्ती व चाकूने वार करायला सुरुवात केली. यात गंभीर जखमी झाल्याने परमानंदचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच वेलतूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. या प्रकरणी वेलतूर पोलिसांनी अक्षय शिवाजी मेश्राम, रा. डोंगरमौदा याच्या तक्रारीवरून भादंवि ३०२, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून तिन्ही आरोपीस अटक केली. (तालुका प्रतिनिधी)