शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

२०१५ मध्ये स्तनाच्या कर्करोगाचे दीड लाखांवर रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 20:16 IST

भारतात २०१५ मध्ये केवळ स्तनाच्या कर्करोगाचे १ लाख ५५ हजार नवे रुग्ण आढळून आले तर यातील ७६ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांमध्ये याविषयी जनजागृती व्हावी, असे आवाहन वरिष्ठ मेडिकल आॅन्कोलॉजिस्ट डॉ. सुशील मानधनिया यांनी केले.

ठळक मुद्देडॉ. सुशील मानधनिया : आजार बळावण्यासाठी दुर्लक्ष, अज्ञान व लाज ठरतेय कारण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गर्भाशयाचा कर्करोग स्त्रियांमध्ये सर्वसामान्यपणे आढळणारा आजार आहे. ‘पॅपस्मियर्स’ आणि ‘एचपीव्ही’ (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) या नियमित चाचण्यांच्या मदतीने या आजाराची तपासणी करता येते. या आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी १४ वर्षांवरील मुला-मुलींना लस देणे हा एक चांगला पर्याय आहे. या शिवाय स्तनाच्या कर्करोगामध्ये स्वत:हून तपासणी करून निदान करणे हा एक चांगला पर्याय असतानाही दुर्लक्ष, अज्ञान व लाजेमुळे स्त्रिया कर्करोगाला गंभीरतेने घेत नाही. भारतात २०१५ मध्ये केवळ स्तनाच्या कर्करोगाचे १ लाख ५५ हजार नवे रुग्ण आढळून आले तर यातील ७६ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांमध्ये याविषयी जनजागृती व्हावी, असे आवाहन वरिष्ठ मेडिकल आॅन्कोलॉजिस्ट डॉ. सुशील मानधनिया यांनी केले.८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत डॉ. मानधनिया यांनी कर्करोगाला दूर ठेवण्यासाठी महिलांमध्ये जनजागृती व लवकर निदान यावर भर दिला. स्तनाचा कर्करोग हा भारतीय महिलांमध्ये सर्वात सामान्य आहे. दरदिवशी या कर्करोगाचे २०० नवे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे योग्य जीवनशैली व जनुकीय घटकांबद्दल अधिक जागृत राहणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.यांना कर्करोगाचा धोका अधिकडॉ. मानधनिया म्हणाले, स्तनाच्या कर्करोगाला कौटुंबिक इतिहास असतो. आपल्या निकटच्या नातेवाईकाला झाला असल्यास त्याच्याकडून तो पसरण्याची भीती असते. महिलांचे वय वाढते तसा धोकाही वाढतो. वयाच्या १२ व्या वर्षाच्या आधी मासिक पाळी सुरू होणे, वयाच्या ५० वर्षानंतर रजोनिवृत्ती संपणे, मूल झालेले नसणे तसेच मद्यपान, अधिक चरबीयुक्त आहार, चोथायुक्त अधिक आहार, धूम्रपान, लठ्ठपणा आणि आधी गर्भाशयाचा किंवा कोलोनचा कर्करोग झालेला असणे, अशा महिलांना स्तनाचा कर्करोग होण्याचा अधिक धोका असतो.एक लाख लोकसंख्येत स्तनाच्या कर्करोगाचे २५.८ रुग्णडॉ. मानधनिया म्हणाले, भारतात एक लाख लोकसंख्येमध्ये २५.८ रुग्ण हे स्तनाच्या कर्करोगाचे आढळून येतात. तर याच लोकसंख्येमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामध्ये २०.२ रुग्ण, आतड्यांच्या कर्करोगामध्ये ४.५ तर अंडाशयाचा व कोलोनचा कर्करोगामध्ये ४.५ रुग्ण आढळून येतात. पहिल्या टप्प्यातच कर्करोगाचे निदान झाल्यास उपचाराचा यशाचा टक्का ९० असतो तर तिसऱ्या  व चौथ्या टप्प्यात निदान झाल्यास हा टक्का १०वर येतो.

टॅग्स :cancerकर्करोगWomen's Day 2018महिला दिन २०१८