आॅनलाईन लोकमतवर्धा-देवळीजवळ असलेल्या वडद येथे रविवारी रात्री ११.३० च्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या कारचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार झाला असून दुसरा जखमी झाला आहे.धामणगाव तालुक्यातील जळगाव आर्वी येथील सुरेंद्र रामदास निरगुडे व मारोती झलके हे दोघे स्विफ्ट डिझायर या गाडीने हिंगणघाटला लग्नानिमित्त केले होते. परतीच्या प्रवासात देवळीमार्गे येत असताना अचानक टायर फुटल्याने गाडीने तीन पलट्या मारल्या व ती बाजूच्या झाडावर आदळली. यात सुरेंद्र निरगुडे हे ठार झाले तर मारोती झलके गाडीबाहेर फेकले गेल्याने त्यांना किरकोळ जखमा झाल्या.
टायर फुटल्याने एक ठार
By admin | Updated: July 3, 2017 15:59 IST