शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेत एक ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : भरधाव अज्ञात वाहनाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : भरधाव अज्ञात वाहनाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना मनसर-तुमसर मार्गावरील रामटेक शहरालगतच्या अंबाळा परिसरातील वळणावर शुक्रवारी (दि. ४) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.

श्यामल चिंधूजी उईके (२७, रा. भेंडाळा, ता. मौदा) असे मृताचे तर निहार श्रावण सरोदे, रा. शिरपूर, ता. रामटेक असे जखमीचे नाव आहे. ते दाेघेही शिरपूर येथून दाहाेदा (घाेटी) येथे लग्नाला गेले हाेते. लग्न आटाेपल्यानंतर दाेघेही एमएच-४०/झेड-८१७९ क्रमांकाच्या माेटरसायकलने दाहाेदा (घाेटी) येथून शिरपूरला परत येत हाेते.

दरम्यान, ते रामटेक शहरालगतच्या अंबाळा येथील वळणावर पाेहाेचताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात दाेघांनाही गंभीर दुखापत झाली. घडक देताच वाहनचालक वाहनासह पळून गेला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून दाेन्ही जखमींना लगेच रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती श्यामलला मृत घाेषित केले तर निहारवर प्रथमाेपचार करून त्याला नागपूरला रवाना केले. त्याला नागपूर शहरातील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.