शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

इमामवाड्यात एकाची हत्या

By admin | Updated: October 14, 2015 03:31 IST

क्षुल्लक कारणावरून गुंडाच्या एका टोळीने रविवारी रात्री रामबागमध्ये अक्षरश: हैदोस घातला. ..

नागपूर : क्षुल्लक कारणावरून गुंडाच्या एका टोळीने रविवारी रात्री रामबागमध्ये अक्षरश: हैदोस घातला. एका व्यक्तीची हत्या केली. तर, त्याच्या मुलाला गंभीर जखमी केले. यामुळे रविवारी मध्यरात्री रामबाग- इमामवाडा परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. बादल राजू गजभिये ( वय २५) याचे घर रामबागमधील मैत्री बौद्ध विहाराजवळ आहे. याच भागात मन्या ऊर्फ मनोज अलोणे, गोलू ऊर्फ आकाश मोरे, मनोज ऊर्फ लेफटी सहारे हेसुद्धा राहतात. आरोपी मन्याच्या मुलीला रविवारी दुपारी बादलच्या दुचाकीचा कट लागला. त्यावरून मन्या आणि बादलमध्ये वाद झाला. तो दिवसभर धुमसत राहिला. शिवीगाळ धमक्यानंतर दोघांनीही हल्ल्याची तयारी केली. रात्री ११.३० ला मन्या, आकाश मोरेने आपल्या आठ ते दहा साथीदारांना गोळा करून बादलच्या घरावर सशस्त्र हल्ला चढवला. बादलनेही प्रत्युत्तर दिल्याने आरोपी मागे सरले. त्यांना हुसकावण्यासाठी पुढे निघालेले बादलचे वडील राजू पंजाबराव गजभिये (वय ४५) हे एकटे जवळ आल्याचे पाहून आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना ठार मारले. वडिलांच्या मदतीला धावलेल्या बादलवरही तलवारीचे घाव घालून त्यालाही गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली. इमामवाड्याचे एपीआय ए.सी. मोहनकर यांनी आरोपीविरुद्ध हत्या आणि अन्य कलमानुसार गुन्हा नोंदविला. बादलवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहे. (प्रतिनिधी)