शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील एक ग्रा. पं. हरवली, शोधणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 10:23 IST

नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. निवडणूक ३८१ ग्रा.पं.साठी होत असली तरी जिल्ह्यात नेमक्या ग्रामपंचायती किती, यावरून सध्या संभ्रम आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात नेमक्या ग्रा.पं किती?निवडणुकीपूर्वीच प्रशासनाचा गोंधळ

जितेंद्र ढवळे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. २६ सप्टेंबर रोजी ही निवडणूक होईल. निवडणूक ३८१ ग्रा.पं.साठी होत असली तरी जिल्ह्यात नेमक्या ग्रामपंचायती किती, यावरून सध्या संभ्रम आहे. त्यामुळे ग्रामपंचायती वास्तवात हरविल्या की कागदी घोडे नाचविताना कुणाच्या हाताने ही प्रशासकीय चूक झाली, हे सध्याच स्पष्ट झाले नाही.ग्रा.पं. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाने एक पत्रक जारी केले आहे. यात नागपूर जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींची संख्या ७६८ इतकी असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार काटोल तालुक्यात ८३, नरखेड (७०), सावनेर (७५), कळमेश्वर (५०), रामटेक (४८), पारशिवनी (५१), मौदा (६३), कामठी (४७), उमरेड (४७), भिवापूर (५६), कुही (५८), नागपूर ग्रामीण(६७) आणि हिंगणा तालुक्यात ५३ ग्रा.पं.असल्याचे नमूद आहे. इकडे निवडणूक अधिकारी नगर पंचायत, नागपूर कार्यालयाने जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्राची प्रत माध्यमांना पुरविली आहे. यात नागपूर जिल्ह्यात एकूण ७६९ ग्रा.पं.असल्याचे नमूद केले आहे.त्यानुसार काटोल तालुक्यात ८३, नरखेड (७०), सावनेर (७५), कळमेश्वर (५०), रामटेक (४८), पारशिवनी (५१), मौदा (६२), कामठी (४७), उमरेड (४७), भिवापूर (५६), कुही (५९), नागपूर ग्रामीण (६८) आणि हिंगणा तालुक्यात ५३ ग्रा.पं. असल्याचे नमूद केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जारी केलेल्या ग्रामपंचायतींच्या यादीत एका ग्रामपंचायतीचा फरक आहे. त्यामुळे जिल्ह्यात एक ग्रामपंचायत हरविली का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.इकडे जि.प.च्या संकेतस्थळावर जिल्ह्यात ७७० ग्रा.प.असल्याचे नमूद करण्यात आल्याने हा गोंधळ आणखी वाढला आहे.

मौदा, कुही, नागपूर ग्रामीणमध्ये घोळजि.प.च्या मुख्य कार्यकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जारी केलेल्या पत्रात ग्रामपंचायतीचा घोळ मौदा, कुही आणि नागपूर ग्रामीण तालुक्यात दिसून येतो. कदाचित हा घोळ तांत्रिक स्वरुपाचा असावा. मात्र डिजिटल नागपूर जिल्ह्यातील या घोळामुळे जिल्ह्यात एक ग्रामपंचायत कमी झाली की वाढली याबाबत संभ्रम आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक