उमरेड : परस्पर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराने समाेरील दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना उमरेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील भिवापूर मार्गावर मंगळवारी (दि. ८) सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.
ज्ञानेश्वर श्यामराव चंदनबावणे (३८, रा. जवळी, ता. भिवापूर) असे मृताचे नाव आहे. ज्ञानेश्वर हा आपल्या दुचाकीने भिवापूर येथे जात हाेता. दरम्यान, भिवापूर मार्गावरील बालपांडे यांच्या शेताजवळ एमएच-४०/बीए-२५९२ क्रमांकाचा आराेपी दुचाकीस्वार संताेष तुळशीराम बेलेकर (४२, रा. घाटंजी, जि. यवतमाळ) याने ज्ञानेश्वर चंदनबावणे यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात गंभीर जखमी हाेऊन ज्ञानेश्वरचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी फिर्यादी राजू हरिभाऊ चंदनबावणे (४१, रा. मंगळवारी पेठ, उमरेड) यांच्या तक्रारीवरून आराेपी दुचाकी चालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३३७, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक लाेले करीत आहेत.