शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

विदर्भात दीड लाख रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 23:01 IST

Corona Nagpur News गुरुवारी १३९० रुग्ण व ४२ मृत्यूची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १७३२२७ तर मृतांची संख्या ४७०५ झाली आहे. १५०५७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

ठळक मुद्दे१३९० रुग्ण व ४२ मृत्यूची भर रुग्णसंख्या १७३२२७ तर मृतांची संख्या ४७०५

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंगणीक कमी होत चालला आहे. गुरुवारी १३९० रुग्ण व ४२ मृत्यूची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १७३२२७ तर मृतांची संख्या ४७०५ झाली आहे. १५०५७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. विशेष म्हणजे, अमरावती विभागाच्या तुलनेत मात्र नागपूर विभागात रुग्णसंख्येची गती अधिक आहे. विशेषत: चंद्रपूर, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात रुग्णसंख्येत खूप जास्त घट झालेली नाही.नागपूर जिल्ह्यात आज ५८८ नवे रुग्ण व २३ मृत्यू झाले. रुग्णसंख्या ८९०८७ तर मृतांची संख्या २८९२ वर पोहचली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १९९ व दोन रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या १२९४५ तर मृतांची संख्या १९५ झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात १२० रुग्ण आढळून आले असून दोन रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णाची संख्या ८२७३ तर मृतांची संख्या ११० झाली आहे. भंडारा जिल्ह्यात ९१ रुग्ण व दोन मृत्यूची भर पडली. रुग्णसंख्या ७१९२ व १७९ रुग्णांचे मृत्यू झाले. अमरावती जिल्ह्यात ७२ पॉझिटिव्ह व चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या १५१९० झाली असून मृतांची संख्या ३४३ वर पोहचली आहे. गडचिरोली जिल्ह्यात ७० रुग्ण व दोन रुग्णाचे मृत्यू झाले. वाशिम जिल्ह्यात ५२ रुग्ण आढळून आले. वर्धा जिल्ह्यात ६८ रुग्ण व दोन मृत्यूची नोंद झाली. यवमाळ जिल्ह्यात ६१ रुग्ण व दोन मृत्यू झाले. बुलढाणा जिल्ह्यात ३७ रुग्ण व दोन मृत्यू तर अकोला जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे, ३२ रुग्ण व एका मृत्यूची भर पडली.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या