शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या गाण्यांचा काळ लवकरच येणार

By admin | Updated: October 4, 2015 03:24 IST

आजच्या गाण्यांमध्ये संगीत कमी आणि गोंगाटच अधिक असतो. त्यात जुन्या गाण्यांप्रमाणे कुठेही रस दिसून येत नाही. त्यामुळे लवकरच पुन्हा जुनी गाणी व संगीताचा काळ येईल, ..

आजच्या गाण्यात गोंगाटच अधिक : संगीतकार रवींद्र जैन यांचा विश्वास नागपूर : आजच्या गाण्यांमध्ये संगीत कमी आणि गोंगाटच अधिक असतो. त्यात जुन्या गाण्यांप्रमाणे कुठेही रस दिसून येत नाही. त्यामुळे लवकरच पुन्हा जुनी गाणी व संगीताचा काळ येईल, असा विश्वास प्रख्यात संगीतकार डॉ. रवींद्र जैन यांनी शनिवारी व्यक्त केला. बादल आर्टस् व स्वरमधूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी देशपांडे सभागृहात आयोजित ‘अखियों के झरोको से...’ या कार्यक्रमासाठी ते नागपुरात आले असता ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. जैन पुढे म्हणाले, आजचे तरुण कलाकार एका रात्रीतून स्टार बनण्याचे स्वप्न पाहात आहेत. परंतु ते योग्य नाही. त्यांनी धैर्य राखले पाहिजे. शॉर्टकटचा मार्ग कधीही धोक्याचा असतो. त्यामुळे तरुणांनी अगोदर संगीतात पारंगत झाले पाहिजे. त्यासाठी चांगल्या गुरू कडे शिक्षा घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. सध्या ते ‘तानसेन’ हा चित्रपट तयार करीत असून, या चित्रपटातील संगीत व दिग्दर्शन त्यांचे राहणार आहे. रवींद्र जैन यांचे वडील पंडित इंद्रमणी जैन संस्कृतमधील विद्वान व आयुर्वेदाचार्य होते. नागपूरविषयी बोलताना, या शहराशी आपला फारच घनिष्ठ संबंध राहिला असल्याचे त्यांनी सांगितले. येथील महालेखाकार कार्यालयात त्यांचे मोठे बंधू डी.के. जैन नोकरीला होते, असेही ते म्हणाले. डॉ. रवींद्र जैन यांना पद्मश्री व फिल्मफेअर सारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. उद्या देशपांडे सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात रवींद्र जैन यांनी संगीत दिलेल्या लोकप्रिय गीतांसह संगीताशी निगडीत त्यांच्या जीवनातील रहस्यांचे पैलू उलगडले जाणार आहेत. या कार्यक्रमात गायक राजेश दुरुगकर, राजू व्यास, श्रद्धा जोशी, आकांक्षा नगरकर, रिजवान साबरी, अरुण बोडे व संजय इंगळे विविध लोकप्रिय गाणे सादर करतील. (प्रतिनिधी)