शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

वृद्धाची हत्या

By admin | Updated: January 17, 2016 02:46 IST

जादूटोण्याचा संशय : कोलितमारा येथील घटना, आरोपीला अटक

पारशिवनी : जादूटोण्याच्या संशयावरून एका वृद्धावर कुऱ्हाडीचे घाव घालून त्याचा निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपीला पारशिवनी पोलिसांनी अटक केली. ही थरारक घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोलितमारा येथे शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.कैलास रघुनाथ कोडवते (२८, रा. कोलितमारा, ता. पारशिवनी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ढालसिंग नंदलाल उर्माले (८५) असे मृत वृद्धाचे नाव आहे.कोलितमारा येथील ढालसिंग उर्माले हे आपल्या घरी झोपले होते. यावेळी त्यांची पत्नी रायवंतीदेखील शेजारच्या खाटेवर झोपलेली होती. दरम्यान, रात्री ११ वाजताच्या सुमारास आरोपी कैलास कोडवते याने उर्माले यांच्या घरी प्रवेश केला. अंधाराचा फायदा घेत ढालसिंग यांच्या डोक्यावर त्याने कुऱ्हाडीने वार केले. ढालसिंग यांच्या पत्नीला जाग येताच, आरोपी तेथून पसार झाला.या घटनेची माहिती पारशिवनी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पारशिवनीचे ठाणेदार कैलास तानकर, सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. खोकले, जानराव बडवाईक, राजू रेवतकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी गावात नाकाबंदी करून आरोपीबाबत तपास सुरू केला. यात आरोपी कैलास कोडवते यास अटक करण्यात पोलिसांना यश आले. आरोपीविरुद्ध पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर कोलितमारा स्मशानभूमीत मृत ढालसिंग उर्माले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)