शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

तेल स्वस्त - डाळी महागल्या

By admin | Updated: September 17, 2014 00:56 IST

जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत घट होईल, असा अंदाज बांधून असणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या पदरात अद्याप काहीही पडले नाही. खाद्य तेल व गहू वगळता इतर वस्तूंमधून दरवाढीचे चक्र कायमच आहे.

सुकामेव्यात भाववाढ : मसाले स्थिरनागपूर : जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत घट होईल, असा अंदाज बांधून असणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या पदरात अद्याप काहीही पडले नाही. खाद्य तेल व गहू वगळता इतर वस्तूंमधून दरवाढीचे चक्र कायमच आहे. त्याचा सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत आहे. सध्या पावसामुळे भाज्यांच्या किमतीत वाढ झालेली दिसत आहे. काही महिन्यांपासून कांदे आणि बटाट्याचे भाव स्थिर आहेत. कळमना धान्य बाजाराचे विश्लेषक आणि व्यावसायिक रमेश उमाटे यांनी सांगितले की, महिन्याभरात गहू वगळता सर्व प्रकारच्या तांदळाचे भाव १०० ते २५० रुपयांपर्यंत तर तूर डाळीच्या किमती एक हजाराने वधारल्या आहेत. याशिवाय मसूर डाळीत क्विंटलमागे ६०० रुपयांची तेजी आली आहे. अनियमित पावसामुळे भाववाढ झाली असून पुढे भाव स्थिर राहतील, असा अंदाज आहे. पितृपक्षामुळे इतवारी ठोक बाजारातच नव्हे तर शहरात सर्वत्र मंदीचे वातावरण आहे. नवरात्रात उत्साह संचारेल, अशी अपेक्षा आहे. सध्या इतवारी ठोक बाजारात लोकवन गहू १८०० ते २१०० रुपये क्विंटल, शरबती २४०० ते ३०००, तुकडी २००० ते २३००, सुवर्णा तांदूळ २४०० ते २६५०, बीपीटी २८५० ते ३५५०, एचएमटी ४१००-४४००, श्रीराम ४९००-५५००, चिन्नोर ५२००-५६००, तूर डाळ दर्जानुसार ६५०० ते ७५५०, चना डाळ ३५००-४२५०, मूंग मोगर ९००० ते ९५००, मूंग डाळ ७८०० ते ८५००, मसूर डाळ ६५०० ते ७०००, उडद मोगर ८२०० ते ९५००, हिरवा मटर ४२०० ते ६०००, काबुली चना ५५०० ते ७००० रुपये भाव आहेत. दिवाळीपर्यंत भाववाढीची शक्यता नाही, असे रमेश उमाटे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)सोयाबीन तेल सहा रुपयांनी स्वस्त!सध्या खाद्य तेलात ‘अच्छे दिन’ आहेत. विदर्भात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सोयाबीन तेलात महिन्याभरात प्रति किलो सहा रुपयांची घसरण झाली असून किरकोळमध्ये प्रतिकिलो भाव ७० रुपये आहेत. एका वर्षाआधी ८० रुपयांवर होते. आॅगस्टमध्ये ११३० रुपयांवर गेलेले १५ किलोचे भाव (प्रति टिन) सध्या १०४० ते १०६० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. वर्षाआधी १२५ रुपये किलोवर पोहोचलेले फल्ली तेल सध्या ९० रुपयांपर्यंत खाली आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून फल्ली तेलाचे भाव स्थिर आहेत. खाद्य तेलाच्या विक्रीच्या आकडेवारीनुसार विदर्भात ७० टक्के सोयाबीन तेलाची विक्री होते. उर्वरित तेलाची विक्री ३० टक्के आहे. यात फल्ली, जवस, पामोलिन, सरसो, खोबरेल, एरंडी, सनफ्लॉवर या खाद्य तेलांचा समावेश आहे. ठोक बाजारात एक महिन्यात सर्वच खाद्य तेलात १५ किलोमागे ६० ते ७० रुपयांची घसरण झाली. पामोलिन तेल प्रतिकिलो ६० रुपये, वनस्पती घी ६७, सरसो तेल ७२, कॉटन तेल ६६, राईस ब्रॅण्ड ७०, खोबरेल १९० तर सनफ्लॉवर ७५ रुपये आहे. तेल व्यापारी अनिलकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, सध्या खाद्यतेल सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहे. जवळपास ४० लाख लोकसंख्येच्या नागपूर जिल्ह्यात दररोज ५ हजार डब्बे (१५ किलो) विकले जातात. नागपुरात पॅकिंग करणारे १५ व्यापारी आहेत. दिवाळीपर्यंत भाववाढीची अपेक्षा नाही.बदाम व आक्रोडची भाववाढ, मसाले स्थिरइतवारी ठोक बाजारात मसाल्याचे भाव स्थिर असून मागणीअभावी बादाम वगळता सुका मेव्यात मंदी आहे. मागणीचा अभाव आणि एलबीटीच्या त्रासामुळे कोणताही व्यापारी बाहेरून माल बोलविण्याच्या स्थितीत नाही. इतवारी ठोक बाजारात बादामाचे भाव १०० रुपयांनी वाढून ७१० रुपयांवर गेले आहेत. अंजीर ४५० ते ५०० रुपये किलो, पिवळी खारक ७५ ते ८०, दर्जानुसार काळी खारक १०० ते ३००, किसमिस २८० ते ३८०, काजू ५८० रुपये, पिश्ता दर्जानुसार ७०० ते १५०० रुपये किलो भाव आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये पुरामुळे आक्रोडचे पीक पूर्णत: खराब झाले आहे. केवळ पाच दिवसांत किलोमागे २०० रुपयांची वाढ होऊन दर्जानुसार भाव ८०० ते १००० आणि १४०० ते १६०० रुपयांवर पोहोचल्याची माहिती बाजार विश्लेषक चंदन गोस्वामी यांनी दिली.मसाल्यात मंदीदरदिवशी वाढणारे मसाल्याचे भाव गेल्या महिन्याभरापासून स्थिर वा कमी झाले आहेत. लवंग ८४ रुपये किलोवरून ८८ रुपये, शहाजिरे ५४० वरून ४६०, जिरे मध्यम १२४ वरून ११८, धणे (मध्यम) १२६ वरून ११८, हिरवे धणे १८०, हिरवी विलायची ११५० वरून १०८०, मेथी दाणे ६६, खाकस ३३० ते ४८०, खोबरेल डोल २२० वरून १९० आणि काळीमिर्चचे भाव ८०० रुपयांवरून ७२५ रुपयांपर्यंत खाली आल्याचे गोस्वामी यांनी स्पष्ट केले.