शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ंगॅस एजन्सींवर अधिकारी नाराज

By admin | Updated: April 2, 2015 02:43 IST

गॅस कंपन्यांचे अधिकारी आणि ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत २५ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत गॅस एजन्सींतर्फे देण्यात येणाऱ्या...

नागपूर : गॅस कंपन्यांचे अधिकारी आणि ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत २५ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत गॅस एजन्सींतर्फे देण्यात येणाऱ्या निकृष्ट ग्राहक सेवेवर जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी नाराजी व्यक्त केली. ग्राहक सेवा सुधारा, अन्यथा एजन्सी रद्द करू, असा इशारा त्यांनी बैठकीत दिला.अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे राष्ट्रीय महासचिव देवेंद्र तिवारी यांनी लोकमतला सांगितले की, ग्राहकांना सबसिडीचे सिलिंडर ७१० रुपयांत मिळत आहे. पण केंद्र सरकारच्या दरनिश्चितीनुसार हे सिलिंडर ग्राहकाला ७०१.५० रुपयांत मिळायला हवे.याशिवाय शहरातील तिन्ही कंपन्यांच्या एजन्सीचे संचालक ग्राहकांना घरपोच सिलिंडर न देता गोडावूनमधून घ्यायला सांगतात. अशा स्थितीत वाहन खर्चाचे १८ रुपये कमी न करता ग्राहकांना पूर्ण किमतीत सिलिंडर घ्यावे लागते. राज्य सरकारसुद्धा सिलिंडरच्या किमतीवर ३० रुपये व्हॅट आकारते. सिलिंडरची किंमत, वाहन खर्च आणि व्हॅट याचा विचार केल्यास ग्राहकांकडून अनावश्यक ५६.५० रुपये वसूल करण्यात येत आहेत. यावर गांभीर्याने विचार व्हावा, अशी मागणी तिवारी यांनी बैठकीत केली. (प्रतिनिधी)एजन्सी रद्द करारेशीमबाग येथील सारंग गॅस एजन्सी आणि काँग्रेसनगर येथील भेंडे गॅस एजन्सी बहुतांश ग्राहकांना घरपोच सिलिंडर देता गोडावूनमधून घेण्याचे आदेश देतात. नाईलाजास्तव ग्राहकसुद्धा गोडावूनमधून सिलिंडरची उचल करतात. या एजन्सी वाहन खर्चाचे १८ रुपये कमी करीत नाहीत. यासंदर्भात इंडियन गॅसचे क्षेत्रीय अधिकारी निपाणे यांच्याकडे तक्रार केल्यानंतरही ते जाणीपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. त्याचा फटका ग्राहकांना बसतो. ग्राहकांना परिपूर्ण सेवा न देणाऱ्या दोन्ही एजन्सीचा परवाना रद्द करावा आणि अधिकारी निपाणे यांना निलंबित करावे, अशी मागणी देवेंद्र तिवारी यांनी बैठकीत केली.