शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीबाबत अधिकाऱ्यांची उदासीनता

By admin | Updated: April 5, 2015 02:31 IST

कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान आणि ऊर्जाकेंद्र असलेल्या दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र घोषित करण्याबाबत नगर विकास विभागाचे अधिकारी

नागपूर : कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान आणि ऊर्जाकेंद्र असलेल्या दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र घोषित करण्याबाबत नगर विकास विभागाचे अधिकारी उदासीन असून टाळाटाळ करीत असल्याची बाब माहितीच्या अधिकारांतर्गत उघडकीस आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्धधम्माची दीक्षा घेऊन ज्या ठिकाणी ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन घडवून आले. ते ठिकाण म्हणजे दीक्षाभूमी होय. दीक्षाभूमीवर आज आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभे आहे. जगभरातील लोकांसाठी हे ठिकाण ऊर्जेचे केंद्र बनले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप शहर उपाध्यक्ष भूषण दडवे यांनी २१ मे २०१३ रोजी दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र घोषित करण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनाही निवेदन सादर करण्यात आले होते. जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी यासंबंधात शासनाला शिफारससुद्धा केली होती. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख यांनी विधानसभेत व परिषदेत यासंबंधात प्रश्न उपस्थित केला होता. १० डिसेंबर २०१३ रोजी हिवाळी अधिवेशनात यासंबंधीच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर देतांना दीक्षाभूमीला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले होते. यापार्श्वभूमीवर नगरविकास विभागाने कुठली कारवाई केली, याची माहिती दडवे यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत विचारली तेव्हा नगर विकास विभागातर्फे कक्ष अधिकारी व जन माहिती अधिकारी राजेश पाध्ये यांनी यासंबंधात कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच ११ आॅगस्ट २०१४ चे पत्र कार्यालयास प्राप्त झालेच नसल्याचेही सांगितले. एकूणच अधिकारी हे या प्रकरणाबाबत उदासीन असून टाळाटाळ करीत आहेत. (प्रतिनिधी)