शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

मनपा आयुक्तांसह अधिकारी सायकलने पोहोचले  कार्यालयात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 00:30 IST

Municipal Commissioner reached the office by bicycle, nagpur news पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी शुक्रवारी महापालिका आयुक्तांसह अन्य अधिकारी सायकलीने महापालिका कार्यालयात पोहोचले.

ठळक मुद्दे‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत घेतली हरित शपथ : पर्यावरण संरक्षणाचा संदेश

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी शुक्रवारी महापालिका आयुक्तांसह अन्य अधिकारी सायकलीने महापालिका कार्यालयात पोहोचले. आयुक्तांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हरित शपथ देऊन पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संकल्प केला.

शासनाने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सायकलने कार्यालयात येण्याचे आवाहन केले होते. त्याअंतर्गत महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शासकीय निवासस्थान तपस्यापासून महापालिका कार्यालयापर्यंत सायकलीने प्रवास केला. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनीही निवासस्थानापासून कार्यालयापर्यंत नऊ किलोमीटरचा प्रवास सायकलीने केला.

या अभियानात अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, साहाय्यक आयुक्त महेश धामेचा, स्वास्थ्य अधिकारी व उपायुक्त (घनकचरा प्रबंधन) डॉ. प्रदीप दासरवार, अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) श्वेता बनर्जी, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, साहाय्यक आयुक्त विजय हुमणे, अतिरिक्त साहाय्यक स्वास्थ्य अधिकारी डॉ. विजय जोशी, क्रीडाधिकारी पीयूष आंबुलकर, उपद्रव शोध पथकाचे (एनडीएस) प्रमुख वीरसेन तांबे, एनएसएससीडीसीएलचे महाव्यवस्थापक शील घुले, राहुल पांडे, प्रणिता उमरेडकर, झोन-२ मधील सफाई कामगार सायकल खेळाडू दिलीप भरत मलिक यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सायकलीने कार्यालयात आले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcommissionerआयुक्तCyclingसायकलिंग