शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारीच ठरताहेत झारीतील शुक्राचार्य

By admin | Updated: October 9, 2015 02:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या क्षेत्रातील एक गाव आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेऊन ...

आदर्श ग्राम योजना : आमदारांनी गाव दत्तक घेऊनही नियोजन विभागाकडे नोंद नाहीनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या क्षेत्रातील एक गाव आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेऊन विकासाच्या माध्यमातून गावाचा कायापालट करण्याचा संकल्प घेतला आहे. यासंदर्भात जिल्हा नियोजन विभागाकडे आतापर्यंत जिल्ह्यातील तीनच आमदारांनी गाव दत्तक घेतल्याची अधिकृत नोंद आहे. त्यामुळे गाव दत्तक घेण्यासंदर्भात लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचे वरवर दिसून येते. मात्र खरा प्रकार वेगळाच आहे. आमदारांनी गाव दत्तक घेऊनही जिल्हा नियोजन विभागाला त्याची माहिती नाही, परिणामी शासनाकडे त्यांची नोंद नाही. अधिकाऱ्यांच्या समन्वयाच्या अभावामुळे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांची ही महत्त्वाकांक्षी संकल्पना राबविण्यास अडथळा निर्माण होत आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर रामटेक विधानसभा मतदार क्षेत्राचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी १२ सप्टेंबर रोजी खैरी-बिजेवाडा ग्राम पंचायत अंतर्गत चारगाव हे गाव दत्तक घेतले होते. यानिमित्त चारगाव येथे एक छोटेखानी कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात गावातील नागरिक, सरपंच, ग्राम पंचायतीचे पदाधिकारी, यांच्यासह खंडविकास अधिकारी आणि तहसीलदार सुद्धा उपस्थित होते. हा जाहीर कार्यक्रम होऊन महिना होत आला. परंतु त्याची अधिकृत माहिती अजूनही तालुका स्तरावरील अधिकाऱ्यानी जिल्हा नियोजन विभागाला सादर केलेली नाही. परिणामी त्याबाबत नोंदणी झाली नसल्याने शासनदरबारी तसा अहवाल पोहोचू शकलेला नाही. असाच काहीसा प्रकार इतर मतदार संघातील क्षेत्रासंदर्भातही झाला असल्याचे यातून स्पष्ट होते. तालुका अधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन विभागाला कळविले नाही आणि जिल्हा नियोजन विभागातील अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यासंदर्भात माहिती घेण्याची तसदी घेतली नाही. अधिकाऱ्यांच्या समन्वयाच्या अभावामुळे आदर्श गाव होण्याच्या एका चांगल्या अभियानाला अजून गती येऊ शकली नाही. (प्रतिनिधी)