शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
4
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
5
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
6
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
7
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
8
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
9
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
10
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
11
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
12
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
13
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
14
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
15
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
16
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
17
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
18
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
19
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅकमेलर प्रेयसी आणि पोलिसांच्या छळामुळे अधिकाऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रेयसी आणि पोलिसांनी संगनमत करून लाखोंची खंडणी उकळल्यानंतर प्रचंड मानसिक त्रास दिल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रेयसी आणि पोलिसांनी संगनमत करून लाखोंची खंडणी उकळल्यानंतर प्रचंड मानसिक त्रास दिल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या महसूल विभागातील एका अधिकाऱ्याने आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने ब्लॅकमेलर प्रेयसी आणि खंडणीबाज पोलिसांच्या पापाचा पाढा लिहून ठेवल्याने ठाणे जिल्हा पोलिसांनी नागपुरातील तीन पोलीस अधिकाऱ्यांसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यातील एका पीएसआयला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाने राज्य पोलीस दलात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.

सचिन चोखोबा साबळे (वय ३८) असे मृत अधिकाऱ्याचे नाव असून, ते मूळचे पुण्यातील रहिवासी होते. आरोपी महिलेचे (प्रेयसी) नाव नीता मानकर-खेडकर आहे. पोलिसांनी नीता, तिची मुलगी, तिचा भाऊ दादा मानकर, पोलीस उपनिरीक्षक दीपक चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमाकांत दुर्गे आणि मेश्राम नामक अधिकारी यांना या प्रकरणात आरोपी केले असून, पीएसआय चव्हाणला अटकही केली आहे.

मृत्यूपूर्वी सचिन साबळे मुंबईला (गोरेगाव पूर्व) बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. आरोपी नीता मानकर उर्फ खेडकर हीसुद्धा याच विभागात कार्यरत असल्याने सचिनसोबत तिचे अनैतिक संबंध जुळले. त्यांच्यात अनेकदा शरीरसंबंध प्रस्थापित झाले होते. त्यांचे एकमेकांकडे जाणे-येणे होते.

नीताचा नवरा एसटीत ड्रायव्हर होता. त्याला व्यभिचारी पत्नीच्या संबंधाची माहिती झाल्याने त्याने डिसेंबर २०२० मध्ये गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी यशोधरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. त्याचा तपास पीएसआय चव्हाणकडे होता. त्याने नीताशी संगनमत करून सचिन साबळेंना पद्धतशीर ब्लॅकमेल करणे सुरू केले. तुमच्या अनैतिक संबंधामुळे नीताच्या पतीने आत्महत्या केली. त्यामुळे तुम्हाला आरोपी बनविण्यात येईल. ते टाळायचे असेल तर साडेचार लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हटले. हादरलेल्या साबळेंनी मुंबईहून येऊन मासुरकर नामक व्यक्तीच्या हाताने तत्कालीन ठाणेदार दुर्गे यांना साडेचार लाख रुपये दिले. काही दिवसांनी पीएसआय चव्हाणने साबळेंना फोन करून ते सर्व पैसे ठाणेदाराने हडपले, आम्हाला काहीच मिळाले नाही, असे म्हणत दोन लाख रुपये मागितले. चव्हाणच्या नातेवाइकाने मुंबईत जाऊन साबळेंकडून हे दोन लाख वसूल केले. नंतर पुन्हा काही दिवसांनी चव्हाणने नव्या ठाणेदारांना या प्रकरणात तीन लाख रुपये पाहिजे, अन्यथा ते ही केस बाहेर काढतील, असे म्हणून धमकावले.

इकडे पोलीस ब्लॅकमेल करून खंडणी वसूल करीत असतानाच आरोपी नीता हिने साबळेंमागे लग्नासाठी तगादा लावला. तुझ्याशी संबंध असल्याचे माहीत झाल्याने पतीने आत्महत्या केली. त्यामुळे तू आता लग्न कर आणि नागपुरात राहायला ये, असे ती म्हणू लागली. तिची मुलगी आणि नीताचा भाऊदेखील साबळेंना धमकावू लागले. सततचे फोन, व्हॉट्सॲप चॅटिंग करून या मंडळींनी कोंडी केल्याने अखेर १८ फेब्रुवारीला साबळेंनी त्यांच्या सदनिकेत गळफास लावून आत्महत्या केली.

----

असा झाला उलगडा

साबळेंनी मृत्यूपूर्वी ब्लॅकमेलर प्रेयसी नीता आणि नातेवाईक तसेच खंडणीबाज पोलिसांच्या पापाचा पाढा लिहून हा मजकूर स्वत:च्या नावे स्वत:च मेल केला. आत्महत्येनंतर त्याच्या डायरीतून ई-मेलचा उलगडा झाल्याने हे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले. सचिनचे मोठे बंधू चंद्रकांत चोखोबा साबळे (वय ४१, गटविकास अधिकारी, आमगाव, जि. गोंदिया) यांनी १० मार्चला ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी साबळेंच्या आत्महत्येला कारणीभूत असलेली नीता, तिची मुलगी, भाऊ दादा मानकर, पीएसआय दीपक चव्हाण, तत्कालीन ठाणेदार दुर्गे आणि मेश्राम नामक पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. चव्हाणला अटक करण्यात आली असून तो सध्या ठाणे पोलिसांच्या कस्टडीत आहे.

----

चव्हाण निलंबित, दुर्गे, मेश्रामवरही कारवाई

या प्रकरणात चव्हाण आणि दुर्गेने साबळेकडून लाखो रुपये उकळल्याचे उघड झाल्याने चव्हाणला निलंबित करण्यात आले असून दुर्गेविरुद्धही कारवाई होणार आहे. मेश्राम या प्रकरणात लाभार्थी आहे की त्यांचे नाव वापरून चव्हाणने पुन्हा तीन लाख हडपण्याचा प्रयत्न केला, ते स्पष्ट न झाल्यामुळे त्यांच्यावरच्या कारवाईसाठी विचारविमर्श सुरू असल्याची माहिती या प्रकरणाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज दिली.

----